Saturday , March 22 2025
Breaking News

निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी

Spread the love

 

आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार राजवाड्यामध्ये ऐतिहासिक व पारंपारिक पद्धतीने दसरोत्सव पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी अमराईतील रेणुका मंदिराजवळ सोने लुटून दसरा साजरा करण्यात आला.
शनिवारी (ता.१२) सकाळी तुळजाभवानीला अभिषेक घालून घट हलविण्यात आला. श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांनी मानाच्या पाच घरात जोगवा मागितला. मांग वाड्यातून आणलेला जोगवा शिजवण्यात आला. त्यानंतर शस्त्रपूजन झाले. मानकरी शिवाजी भोई, गजानन भोई, पांडुरंग भोई, शिवम भोई व मानकरी पालखी घेऊन कुंडावर पूजा केली.
राजवाड्यात पांडुरंग वडेर यांच्या पौरोहित्याखाली नवचंडी होम झाला.
श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते रेणुका मातेचा लिंब नेसविण्यात आला. त्यानंतर मानाची महादेवाची पालखी सासणे गल्लीतून सवाद्य मिरवणुकीने सासनकाठीसह निपाणकर राजवाड्यात आली. राजवाड्यातून श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांची पालखी लव्याजम्यासह रेणुका मंदिराजवळ सिमोलंघनासाठी रवाना झाली.
सायंकाळी श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणकर त्यांनी शहराबाहेरील वेशीवर जाऊन जाऊन आपट्याच्या पानांची पूजा केली. यावेळेस निपाणकर घराण्याचे युवराज श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर, श्रीमंत धनदीपराजे निपाणकर, श्रीमंत शिवतेजराजे निपाणकर, आनंद सोलापूरकर, सुधाकर भोईटे, विश्वास पाटील, गजेंद्र तारळे, संजय पारळे, युवराज पाटील, अजित खराडे, सुजित गायकवाड यांच्यासह मानकरी उपस्थित होते. पूजेनंतल रेणुका मंदिर येथे मानाच्या दोन्ही पालख्या व शासनकाठी रेणुका मंदिराजवळील कट्ट्यावर आल्यानंतर सिमोल्लंघन सोहळा पार पडला. राजवाड्यामध्ये आल्यानंतर शैला पारले यांच्यासह महिलांनी ओवाळणी केली.
यावेळी बंदुकीच्या बारा बार काढण्यासह नगारा वाजवूनन सिद्धोजीराजेंना राजवाड्यात घेण्यात आले. बळीराजाच्या पोटातील अंगठी काढल्यानंतर देवघरामध्ये तुळजाभवानीची पूजा झाल्यानंतर दरबारात सोने वाटप झाले. रात्री दरबार बरखास्त करून देवीचा व जोतिबाचा चौक मांडून श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते पूजा झाली.
ममदापूरचे गोंधळी श्रीकांत पुजारी, प्रसाद पुजारी, स्वरूप पुजारी, सदा डवरी, किसन डवरी, जोतिबा डवरी यांनी मशाल पेटवून गोंधळ मांडला. त्यानंतर आनंद सोलापूरकर यांनी दसरोत्सवाची सांगता झाल्याचे जाहीर केले.
येथील लिंगायत समाजातर्फे व्हीएसएम संस्थेच्या पटांगणात सिमोल्लंघन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी शमी पूजनाबाबत सवाल झाले. त्यानंतर गणेश कोठीवाले, लिंगराज कोठीवाले, महालिंग कोठीवाले रोहन कोठीवाले यांच्या हस्ते शमी पूजनासह सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्हीएसएमचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, माजी सभापती सुनील पाटील, पुष्कर तारळे, प्रकाश बाडकर, वीरू तारळे, गणेश पट्टणशेट्टी, गजेंद्र तारळे, शशिकांत कोठीवाले, वज्रकांत सदलगे, दीपक पाटील, श्रीनिवास संकपाळ, संतोष ककोठीवाले, गणेश अडीपवाडे, सदानंद दुमाले, संजय मोळवाडे, शिवकांत चंद्रकुडे गणेश खडेद, प्रकाश कुरबेट्टी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. अनिल नेष्टी यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

फासेपारध्यांच्या आंतरराज्य दरोडेखोर टोळीला कागलजवळ अटक

Spread the love  निपाणी पोलिसांची कारवाई : कोगनोळीतील दरोड्याचा उलगडा; ८ तोळे सोन्यासह १० लाखांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *