राजेंद्र वडर : गळतगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती निपाणी (वार्ता) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला पोषक तर होतेच. शिवाय त्यांनी समाजाच्या सुधारणेसाठी नेहमीच कार्य केले आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपराना बंद केल्या. आजही त्यांचे आचार, विचार आणि संस्कार समाजाला प्रेरणादायी ठरतात. फक्त त्यांची जयंती …
Read More »आरोग्य विभागाचे कर्मचारी शब्बीर देसाई यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : अक्कोळ प्राथमिक रूग्णालयातील एफडीए कर्मचारी शब्बीर देसाई हे २५ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. येथील हॉटेल संगम पॅराडाईज येथे आयोजीत कार्यक्रमात तालुका आरोग्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विठ्ठल शिंदे यांनी शब्बीर …
Read More »पावभाजीतून टोमॅटो झाले गायब!
दरवाढीचा ग्राहकांना फटका : ग्राहकांची मागणी कमी निपाणी (वार्ता) : टोमॅटोचे दर आकाशाला भिडल्याने ग्राहकांनी भाजी खरेदी करताना टोमॅटोला सुट्टी दिली आहे. टोमॅटोचे दर ७० ते ९० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने हॉटेलच्या मेन्यूतील पदार्थांमधून टोमॅटो सूप गायब झाले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांची आवडती पावभाजीही आता टोमॅटोविनाच खावी लागत आहे. निपाणीतील …
Read More »निपाणी बाजारपेठेत धोकादायक झाड हटविले
दिवसभर वाहतूक बंद : नगरपालिकेकडून खबरदारी निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी. बी. रोडलगत असणारे जुनाट झाड नगरपालिका प्रशासनाकडून हटविण्यात आले. झाड हटविण्याच्या कामामुळे जुना पी. बी. रोड ते राणी चन्नम्मा सर्कल या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली. झाड जुन्या काळातील असल्याने आणि ते वाहनधारकांसह सार्वजनिकांना धोकादायक ठरत …
Read More »निपाणीतील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक मनोहर बन्ने यांचे निधन
निपाणी (वार्ता) : मुळगाव अक्कोळ (सध्या रा.निपाणी) येथील साहित्यिक आणि पत्रकार मनोहर हालाप्पा बन्ने (वय ७२) यांचे गुरुवारी (ता.३) निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ५) निपाणी विभागातील मराठी वृत्तपत्रातील माजी मुख्य प्रतिनिधी म्हणून सुपरिचित असणारे मनोहर बन्ने हे प्रथितयश लेखक, कवी आणि चांगले समीक्षकही होते. अस्सल ग्रामीण बाज असणाऱ्या …
Read More »ध्येय साध्य करण्यासाठी कणखर मानसिकता हवी
एस. बी. पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपण यशस्वी व्हावे, असे वाटत असते. मात्र त्यासाठी ध्येय निश्चितीची नितांत आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये निश्चितच काही कलागुण किंवा शक्तिस्थाने असतात. मात्र प्रत्येकाला त्याची जाणीव नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीआत्मपरीक्षण करावे. स्वतः ची शक्तिस्थाने ओळखून त्यांचा विकास करणे गरजेचे …
Read More »तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रतीक्षाच!
निवडणुका लांबल्याने इच्छुक अस्वस्थ; नगरपालिकेचा कारभारही प्रशासकाकडेच निपाणी (वार्ता) : मागील चार-पाच वर्षापासून वर्षापासून निपाणीतालुक्यासह जिल्ह्यातील तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकांची प्रतीक्षा सामान्य कार्यकर्त्यांना लागलेली आहे. या निवडणूका दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीआहे. त्यात राज्यातील सत्तांतर झाल्याने नेमके कोणाशी निष्ठावान रहावे, हा देखील प्रश्न कार्यकर्त्यांना पडत …
Read More »समाजातील गरजा शोधून सेवा पुरवा
माजी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतान; रोटरी, इनरव्हील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ निपाणी (वार्ता) : सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय पर्यावरण अशा विविध क्षेत्रात ११८ वर्षांपासून संपूर्ण जगात रोटरी ही एकमेव सामाजिक संस्था कार्यरत आहे आहे. युनोमध्ये मतदानाचा अधिकार असलेल्या रोटरी संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने सेवाभावी वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी …
Read More »‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी केले सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक
नाथाजीराव हलगेकर स्मृतिदिनानिमित्त उपक्रम निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शैक्षणिक क्रांतीचेआद्य हितचिंतक, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व शिक्षण महर्षी नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून निपाणी नगरी स्वच्छ आणि सुंदर करणाऱ्या कामगार बंधू आणि भगिनींचे कौतुक करून आभार मानले. दरवर्षी नाथाजीराव हलगेकर …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये तीन दिवशीय भारत स्काऊट आणि गाईडचे शिबिर
निपाणी (वार्ता) : स्काउट्स आणि गाईड्सचे ध्येय तरुणांना त्यांच्या पूर्ण शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षमतेपर्यंत पोहोच विण्यास मदत करणे हे,आहे. जेणेकरून ते जबाबदार नागरिक बनू शकतील. जे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल घडवू शकतील हे अनुभवात्मक शिक्षणास समर्थन देते. प्रौढांच्या देखरेखीखाली लहान गटांमध्ये सहभाग. विविध प्रगतीशील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta