Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

गांजा विक्री प्रकरणी बोरगावमध्ये दोघांना अटक

  निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या गांजा विकत असताना सदलगा पोलिसांनी धाड टाकून बोरगाव येथील दोघा युवकांना अटक केली आहे. पद्माकर अभयकुमार उपाध्ये (वय ३५) व अभिषेक बाबासाहेब माळी (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पद्माकर उपाध्ये व अभिषेक माळी हे अनेक दिवसापासून …

Read More »

मानसिक ताणतणाव विसरून काम करावे : श्रीधर कोकणूर

  ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर निपाणी (वार्ता) : इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. तर प्रत्येक समाजसेवक मात करत राहिल्यास जीवन सुखी बनते. समूहामध्ये काम करत असताना यश हे एकट्याचे नसते तर सर्वांचे असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कर्मचारी वर्गाने संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणे ही त्यांची जबाबदारी आहे. …

Read More »

महाराष्ट्र राजकारणाच्या सहलीचे निपाणी तालुक्यात लोन!

  ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सहल; लाखो रुपयांचा चुराडा निपाणी (वार्ता) : वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यामध्ये सहलीचे राजकारण करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. त्याची पुनरावृत्ती म्हणून कर्नाटक सीमा भागातील निपाणी तालुक्यात ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सहलीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातूनच अनेक ग्रामपंचायत मध्ये …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्सचे यश

  निपाणी (वार्ता) : इंडिया तायक्वांदो, कर्नाटक ऑलंपिक असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर यांच्यामार्फत ४० वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा बंगळूर कोरमंगल इनडोअर स्टेडियम येथे झाल्या. क्योरगी व पुमसे विभागात खुल्या स्पर्धा व सब जुनिअर कॅडेट ज्युनियर व सीनियर विभागात यशस्वी पार पडल्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर

  कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. गुरुवार तारीख 20 व शुक्रवार तारीख 21 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …

Read More »

निपाणी तालुक्यात संततधार कायम

  सर्व पूल पाण्याखाली; नदीकाठचा परिसर नियंत्रणात निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी (ता.२१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वीरगंगा आणि दूधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अद्यापही तालुक्यातील शनिवार अखेर विविध ठिकाणी विविध …

Read More »

निपाणीकरांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील!

  आमदार शशिकला जोल्ले : ‘आमचा दवाखान्याचे’ उद्घाटन निपाणी (वार्ता) : मागासवर्गीय भागात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘आमचा दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच त्याचा उपयोग होणार असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वी अर्बन हेल्थ सेंटर सुरू करून आरोग्य सुविधा दिल्या आहेत. …

Read More »

पावसाळ्यात राहा सर्पांपासून सावधान!

  निपाणी तालुक्यात विषारी चार जाती : मारण्याऐवजी सर्पमित्रांना द्या माहिती निपाणी (वार्ता) : पावसाळी दिवसात बिळात पाणी भरत असल्याने सर्प बाहेर पडतात. अशावेळी सर्प विषारी असो की बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात. यामुळे या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगत विषारी आणि बिनविषारी सर्पांची माहिती घेण्याची गरज निपाणी परिसरातील सर्पमित्रांनी …

Read More »

ममदापूर ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

  अध्यक्षपदी विद्या शिंदे, उपाध्यक्षपदी गजानन कावडकर निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अमित शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी मतदान पद्धतीने झालेल्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मारुती कावडकर व भाजप गटाचे बाळासाहेब कदम असे दोन अर्ज दाखल झाले. …

Read More »

निपाणी तालुक्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा

  नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी; तालुका प्रशासनाच्या सूचना निपाणी (वार्ता) : शुक्रवारपासून (ता.२१) पुढील चार दिवस निपाणी तालुक्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोणत्याही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना, शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी, असा इशारा तहसीलदार विजयकुमार कटकोळ यांनी दिला …

Read More »