Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

  आमदार शशिकला जोल्ले; रयत संपर्क केंद्रातर्फे बियाणे वाटप प्रारंभ निपाणी (वार्ता) : शासनाने शेतकऱ्यांसाठी रयत संपर्क केंद्राच्या माध्यमातून अनुदानावर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. शासन शेतकऱ्यांसाठी सबसिडीवर अनेक योजना राबवत असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले त्यांनी केले. येथील रयत संपर्क केंद्रातून खरीप हंगामातील सोयाबीन …

Read More »

बेनाडीतील शेतकऱ्याच्या मुलीला तीन सुवर्णपदके

  केएलईच्या दीक्षांत समारंभात गौरव: निपाणी परिसरातून कौतुक निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी (ता.५) बेळगाव येथील केएलई शताब्दी स्मृती सभागृहात पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, केएलई संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलागी, केएलई विद्यापीठ आणि केएलई …

Read More »

परिवर्तनासाठी चळवळीची गरज

प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे संपत्ती आहे आणि ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडेच सत्ता आहे. यामध्ये सामान्य माणूस कुठे आहे? असा प्रश्न पडला आहे. परिवर्तनवादी चळवळ अस्तित्वात आहे का? हेच समजेनासे झाले आहे. चळवळीसाठी जी नैतिक ताकद लागते ती नैतिक ताकद …

Read More »

मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी शिवप्रेमीतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी इतिहास प्रेमी नागरिक चंद्रकांत तारळे यांच्या हस्ते पूजन झाले. नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या हस्ते शिव पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे व विजयराजे …

Read More »

निपाणीतून बोलेरो चोरीस

  निपाणी (वार्ता) : निपाणी-चिकोडी मार्गावर असलेल्या समाधीमठ परिसरातील रहिवासी चेतन संजय घंगाळे यांच्या मालकीचे बोलेरो पिक-अप वाहन अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीसात झाली आहे. सन २०१४ सालचे मॉडेल असलेले सदर वाहन चेतन घंगाळे यांनी शनिवारी (ता.३) रात्री ११ च्या सुमारास आपल्या दारात नेहमीप्रमाणे …

Read More »

निपाणी परिसरात पारंपारिक पद्धतीने बेंदूर

  गांधी चौकात कर तोडणीचा कार्यक्रम : कर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात सोमवारी (ता.५) विविध उपक्रमांनी बेंदूर सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यातील श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या मानाच्या बैल जोडीने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करतोडीचा कार्यक्रम झाला. …

Read More »

बोरगावच्या युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.५) सकाळी उघडकीस आली. शिवाजी बबन निकम (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शिवाजी निकम हा शनिवारी (ता.३) बोरगाव येथे आपल्या घरी काही कारणामुळे …

Read More »

‘नो कॅरी बॅग, ओन्ली कागदी बॅग!

  अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे जनजागृती : विद्यार्थ्यांनी काढली गावभर रॅली निपाणी (वार्ता) : शासनाने बंदी करूनही नागरिक अजूनही एकल वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कॅरीबॅगचा वापर सर्रासपणे करीत आहेत. त्याचा पर्यावरणावर मोठा आघात होत असून ही बाब गांभीर्याने घेऊन येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षकासह विद्यार्थ्यांनी जागतिक …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांचा निपाणीत उद्या काँग्रेसतर्फे सत्कार

  निपाणी(वार्ता) : कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व आमचे नेते सतीश जारकीहोळी हे मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच निपाणी येथे मंगळवारी (ता.६) भेट देणार आहेत. दुपारी तीन वाजता येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये निपाणी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब …

Read More »

यरनाळच्या निवृत्त जवानाने दाखविली पाण्यासाठी माणुसकी!

  कुपनलिकेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा : दिवसभरात सहा तास पाणी निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून नदी तलाव विहिरी आणि कुपनलिकेच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे निपाणी भागातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना शेतीवाडीत धावा धाव करावी लागत …

Read More »