अर्जुनी येथे नृसिंह देवराईसाठी वृक्षारोपण : निपाणीतील ‘सृष्टी’ संघटनेचा पुढाकार निपाणी (वार्ता) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वत्र पर्यावरण संवर्धनाचा जागर घालत वृक्षारोपणासाठी अनेक हात सरसावले आहेत. दरम्यान (अर्जुनी ता. कागल) येथील टेकडीवर नृसिंह देवराई साठी वृक्षारोपण करण्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला. त्यानुसार देवचंद महाविद्यालया तील छात्रसेना, ग्रामस्थ, सयाजी …
Read More »सर्वसामान्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर : युवा नेते उत्तम पाटील
बोरगावमध्ये हुसेन ख्वाजा शमना मिरासाहेब प्रवेशद्वाराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत उद्योग समूहामार्फत गेल्या अनेक दशकापासून बोरगाव शहर परिसराचा सामाजिक विकास करण्यात आला आहे. या विश्वासामुळेच आपणास नगरपंचायत निवडणूक एक हाती सत्ता मिळाली. यापुढे असेच सहकार्य पाटील गटास सर्वांनी द्यावे. आपण निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे …
Read More »आयुर्वेदामुळे निरोगी जीवन शक्य!
अतुलशास्त्री भगरे -गुरुजी : निपाणीत आयुर्वेद चिकित्सा शिबिर निपाणी (वार्ता) : मानवाला निसर्गाने आजपर्यंत बरेच काही दिले आहे. पण त्याचा उपयोग घेताना निसर्गाची किंमत मानवाने ठेवलेली नाही. आपल्या सुख सोयीसाठी तो निसर्गावरच मात करत असल्याने भूतलावर अनेक रोगराई व समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना सारख्या महामारीने मानवाला निसर्ग आणि …
Read More »हालसिध्दनाथ नगर येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत पेव्हर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ
सौंदलगा : येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा हालसिध्दनाथ नगर सौंदलगा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल शेवाळे यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना दादासाहेब कोगनोळे म्हणाले की, एमजी एन.आर.जी. …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निपाणी शहरामध्येच उभारणार
प्रा. सुरेश कांबळे : शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांना भेट निपाणी (वार्ता): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात निपाणी शहराला १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून निपाणी शहरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असल्याचा निर्णय झाल्याची …
Read More »कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ
कोगनोळी : येथील भीम नगर मध्ये मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण निधीतून मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ अमित गायकवाड, रंगराव कागले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आला …
Read More »युवकांनी देशसेवेकडे वळावे
डॉ. अच्युत माने : मेजर गजानन चव्हाण यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : कोणत्याही कार्यात संघटना असेल तर ते कार्य नेहमी तडीस जाते. त्याचे खरे कौशल्य जवानांमध्ये आहे. खऱ्या अर्थाने प्रातिनिधीक स्वरुप हा देशाचा सन्मान आहे. आजच्या तरुण पिढीला आदर्शवत वाटावा असा ऐतिहासिक ठेवा मेजर गजानन चव्हाण यांनी निर्माण केला आहे. …
Read More »जत्राट येथील ८६ घरे त्वरित लाभार्थ्यांना सुपूर्द करा
राजेंद्र वड्डर : जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सन २००५ सालापासून जत्राट येथील पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरे वितरण करण्यात येत आहे. पण ते गेल्या १७ वर्षांपासून मिळालेली नाहीत. त्यामुळे सदर घरे वितरणात झालेल्या विलंबाबाबत ताबडतोब चौकशी करून लाभार्थ्यांना घरे वितरण करण्याची मागणी भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वड्डर पवार …
Read More »निपाणी तालुक्यात शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त
निपाणी : गेले 8 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी सोयाबीन भुईमूग, मक्का पेरणी केलेल्या शेतामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने कोळपी मारण्याच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत. तर कांही ठिकाणी हाताने ओढून कोळपी मारण्याचे काम करीत आहेत, कोळपी मारून झालेल्या वावरामध्ये लागलीच पाठीमागुन खुरप्याने भांगलन करून शेतीशिवारे स्वच्छ ठेऊन पिके जोमाने डोलताना …
Read More »सरकारी मराठी मुलांची शाळा आणि कन्नड शाळेच्या स्वयंपाक खोलीच्या बांधकाम कामाचा शुभारंभ
सौंदलगा : येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि कन्नड शाळेसाठी ग्रामपंचायत एन.आर.जी. फंडातून मंजूर झालेल्या स्वयंपाक खोलीच्या बांधकाम कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला. सुरुवातीला एसडीएमसी अध्यक्ष शंकर कदम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सनदी, शोभा कोळी, एसडीएमसी सदस्या प्रियंका कोळी, शिक्षिकांच्या हस्ते जागेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta