Monday , September 21 2026
Breaking News

कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

Spread the love

कोगनोळी : येथील भीम नगर मध्ये मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण निधीतून मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ अमित गायकवाड, रंगराव कागले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून  गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आला आहे. भीम नगर येथे गेल्या अनेक दिवसापासून रस्ता तयार करून मिळावा अशी मागणी होती. यासाठी समाज कल्याण निधीतून 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे, माजी तालुका पंचायत सदस्य किरण निकाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिन निकम, कुमार व्हटकर, अंकुश दाभाडे, अजित पाटील, मोहन ढाले, सुरेश आवटे, नंदकुमार ढाले, विलास नाईक, अजित तहसीलदार, शिवानंद खोत, विश्वनाथ ढाले, आकाश आवटे, श्रीनिवास ढाले, विशाल शिंत्रे, अक्षय कांबळे, प्रणव मेस्त्री, सागर ढोबळे, राहुल ढाले, मोहन ढाले, निलेश मोहिते, गणेश जिरगे, हेमंत ढाले यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *