Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

निपाणी बस स्थानकात इचलकरंजीच्या महिलेचे दीड तोळे दागिने लंपास

  निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकात निपाणीहून इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. मिलाग्रीन मदर (रा. इचलकरंजी) असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मिलाग्रिन मदर यांचे माहेर – हल्ल्याळ (ता.दांडेली) …

Read More »

निपाणी-हुपरी मार्गावर बसची शर्यत; विद्यार्थी, नोकरदारातून संताप

  निपाणी (वार्ता) : निपाणी आगाराच्या नियोजनाअभावी निपाणी-हुपरी मार्गावर एकामागोमाग बस धावताना दिसत आहेत. त्यामुळे बसची त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ हुपरी, निपाणी बसस्थानकावर थांबावे लागत असल्याने खोळंबा होत आहे. परिणामी संताप व्यक्त होत आहे. बसच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक मार्गावर बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत फेऱ्यांचे …

Read More »

मराठा बटालियनच्या सायकलस्वारांचे मध्यवर्ती शिवाजी चौकात स्वागत

  निपाणी (वार्ता) : बेळगाव ते सिंहगड या ६०० किलोमीटर सायकल रॅलीने गडकोटला भेट देणाऱ्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या ११ सायकल स्वार जवानांचे निपाणीत मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि निपाणी भाग आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले. ४ फेब्रुवारीला झालेल्या मराठा दिनानिमित्त ११ लष्करी …

Read More »

कुर्ली क्रिकेट स्पर्धेत रेंदाळचा संघ विजेता

  ग्रामीण भागातून ३२ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : कुर्ली क्रिकेट क्लबतर्फे कुर्ली हायस्कूलच्या मैदानावर खुल्या टेनिसबॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रेंदाळ क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. या संघाला २५ हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात आले. कुर्ली संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात नाथ होलसेलचे मालक …

Read More »

ज्वारी प्रति किलो ७० रुपये

  गरिबाच्या ताटातील भाकरी महागली ; अत्यल्प उत्पादनाचा फटका निपाणी (वार्ता) : पूर्वी गरिबांचा आहार असलेली ज्वारी आता महागली असून ती चक्क गरिबांच्या ताटातून गायबच होऊ लागली आहे. सद्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा हा फटका बसत असल्याचे व्यापाऱ्यांनी …

Read More »

निपाणीत साई यात्रा वार्षिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : येथील साई नगरातील श्री सदगुरु साईनाथ विश्वस्थ मंडळातर्फे मंगळवारपासून (ता.१३) श्री साई यात्रा वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बुधवार अखेर (ता.१४) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.१३)सकाळी ६ वाजता डॉ. प्रियांका माने व डॉ. अभिषेक माने यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर सुवर्णा मेहता, …

Read More »

निपाणीत श्रीराम शोभायात्रेला गर्दीचा उच्चांक

  खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्लेंची उपस्थिती: मिरवणुकीवर पुष्पवृष्टी निपाणी (वार्ता) : हिंदू बांधव व श्रीरामसेना हिंदुस्थानतर्फे रविवार (ता.४ ) सायंकाळी ५ वाजता श्रीरामनवमी भव्य शोभायात्रा काढण्यात या शोभायात्रेला नागरिकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रकारच्या वेशभूषा करून सवाद्य मिरवणूक …

Read More »

ऊस तोडणीसाठी पैश्याची मागणी

  कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज : उत्पादक हतबल कोगनोळी : सीमाभागाला वरदान ठरलेल्या दूधगंगा नदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. सीमाभागा लगत असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा व बेळगाव जिल्ह्यात साखर कारखाने असल्याने तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध असणारा भाग आता झपाट्याने ऊस उत्पादन करण्याकडे वळला आहे. चालू वर्षाचा गळीत हंगाम ऊस …

Read More »

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

  निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा पंचायत, कर्नाटक शिक्षण विभाग, आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साधनांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगरसेवक संतोष सांगावकर होते. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी स्वागत केले. आर. ए. कागे …

Read More »

निपाणीत इंदिरा कॅन्टीनला मंजुरी

  काकासाहेब पाटील : दुसऱ्या कॅन्टीनची मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात दोन इंदिरा कॅन्टीनला मंजुरी मिळाली आहे. निपाणी शहरासाठी आणखी एका इंदिरा कॅन्टीनची मागणी आपण केली आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. त्यामुळे निपाणी व परिसरातील सर्वसामान्य मजूर व नागरिकांची सोय होणार असल्याची माहिती, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. …

Read More »