Monday , September 21 2026
Breaking News

निपाणी-हुपरी मार्गावर बसची शर्यत; विद्यार्थी, नोकरदारातून संताप

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी आगाराच्या नियोजनाअभावी निपाणी-हुपरी मार्गावर एकामागोमाग बस धावताना दिसत आहेत. त्यामुळे बसची त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ हुपरी, निपाणी बसस्थानकावर थांबावे लागत असल्याने खोळंबा होत आहे. परिणामी संताप व्यक्त होत आहे.
बसच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक मार्गावर बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत फेऱ्यांचे योग्य नियोजन करून बस सोडणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे निपाणी आगाराचे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे निपाणी-हुपरी मार्गावर एकामागोमाग दोन-दोन बस धावत आहेत. त्याचवेळी नंतर दोन-तीन तास या मार्गावर बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. निपाणी स्थानकांवरून साधारण अर्ध्या तासाला किंवा एक तासाला हुपरी बस सोडल्यास यमगर्णी, सौंदलगा, बेनाडी, कुन्नूर, मांगूर, यळगूळ येथील प्रवाशांना वेळेवर बस मिळतील. प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही. याशिवाय बेनाडी, मल्लिकार्जुन नगर बस थांबल्यावर बस थांबविले जात त्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.त्या दृष्टीने आगार प्रमुखांनी प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
——————————————————————–
पुढची फुल्ल, मागची रिकामी
निपाणी-हुपरी मार्गावर यमगर्णीपासून हुपरी पर्यंत आठ गावे असून २२ बस थांबे आहेत. या मार्गावर आगाराला चांगले उत्पन्नही मिळते. पण गेल्या दोन महिन्यापासून त्या मार्गावरील बस सेवा विस्कळीत झाली आहे. एकाच वेळी दोन पेक्षा अधिक बस लावल्या जातात. त्यामुळे पुढील बस फुल्ल तर मागील बस रिकामीच धावत असते. अनेक वेळा बेनाडी, मल्लिकार्जुननगर आणि इतर बस थांबल्यावर बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
——————————————————————–
‘सकाळच्या सत्रात विद्यार्थी आणि नोकरदार असल्याने काही वेळा दोन बस सोडल्या जात आहेत. आता वरील मार्गावरील बसचे नियोजन केले जाईल.’
– संगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *