Monday , September 21 2026
Breaking News

रिद्धी सिद्धी महिला मंडळतर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : रिद्धी सिद्धी महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके व प्रज्ञा शिंदे तर अंगणवाडी शिक्षका कल्पना जाधव, अनिता बेळगुंदकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता टेंगेनकेरी गल्ली येथे पार पडला.

प्रारंभी प्रमुख पाहुण्या मीनाताई बेनके व  प्रज्ञा शिंदे तर अंगणवाडी शिक्षका कल्पना जाधव, अनिता बेळगुंदकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना मीनाताई बेनके यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर महिलांना हळदीकुंकू आणि वान देऊन हा हळदीकुंकूचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. अध्यक्ष नलिनी मोहिते, उपाध्यक्ष रेखा राणे यावेळी गल्लीतील महिला उपस्थितीत होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *