रयत संघटनेची मागणी : खांद्यावर नांगर घेऊन विधानसौधपर्यंत पदयात्रा निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊस, सोयाबीन, कापसासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत दर द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे यरगट्टी येथून रविवारी (ता.३) खांद्यावर नांगर घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेने विधानसौधला धडक देण्यासाठी रवाना झाले. मात्र पोलिसांनी केवळ दहा …
Read More »एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे सेवा बजावणाऱ्या कलाशिक्षिका एस.बी. पाटील यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पाटील दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश शाह यांनी सत्कार मूर्तीच्या कामाचे कौतुक …
Read More »सौंदलगा स्मशानभूमीत ६ रोजी व्याख्यानाचे आयोजन
सुजित म्हेत्री : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे कार्यक्रम निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदलगा येथील स्मशानभूमीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात मान्यवराकडून मार्गदर्शन होणार आहे. यावेळी निपाणी तालुक्यातील मानव बंधुत्व वेदीकेचे कार्यकर्ते व …
Read More »विश्वासराव शिंदे नगरमध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील गोसावी, मकवाने समाजाच्या वतीने दिवंगत विश्वासराव शिंदेनगर येथे तिरंगा स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.२) नगरसेवक रवींद्र शिंदे, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, युवा उद्योजक इमरान मकानदार, शिरीष कमते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेतील विजेत्या संघाला ३० हजार आणि …
Read More »हेल्मेट वापरा, जीव वाचवा : सीपीआय तळवार
बसवेश्वर पोलीस ठाण्यातर्फे जनजागृती रॅली निपाणी (वार्ता) : हेल्मेट नसल्याने वर्षभरात झालेल्या विविध ठिकाणी दुचाकी स्वारांच्या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. महामार्गावर अशा अपघातांची संख्या मोठी आहे. हे अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकी सरांनी हेल्मेट वापरून आपला जीव वाचवण्याचे …
Read More »पवन चक्कीसाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी
निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर ते गोंदिकुप्पी या अंतरात सध्या पवनचक्कीद्वारे वीज पुरवठा करण्यासाठी विंडपाॅवर (खांब) उभारण्याचे काम सुरू आहे. अज्ञात चोरट्यांनी या परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणावरून पवनचक्कीचे लाखो रुपये किंमतीचे विविध प्रकारचे साहित्य चोरून नेले आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात फिर्याद नोंद झाली आहे. विंड्रन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड …
Read More »निपाणीत २४ रोजी फुले, शाहू आंबेडकर विचार संमेलन
संजय आवटे, अनंत राऊत प्रमुख वक्ते निपाणी (वार्ता) : निपाणी हे परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र आहे. येथे समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी शेतकरी, कामगार, कष्टकरी, शोषित व वंचितांच्या न्याय हक्कासाठी चळवळी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच समतेची विचारधारा तळागाळात पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. म्हणूनच सामान्य माणूस जात, धर्म, पंथ भाषा या पलीकडे जाऊन …
Read More »कणगला महालक्ष्मी मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा
निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम झाला. अरविंद कमते यांनी स्वागत केले. त्यानंतर मंदिरातील देवीची श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर यांनी ओटी भरून आरती करण्यात आली.श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समईचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाविकांनी महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये ठेवलेल्या शेकडो पणत्या लावून …
Read More »कनकदासांनी जातीयतेविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा
लक्ष्मणराव चिंगळे; तालुका प्रशासनातर्फे कनकदास जयंती निपाणी (वार्ता) : १५ व्या शतकामध्ये संत कनकदासांनी अंधश्रद्धा, जातीयतेविरुद्ध कीर्तन आणि साहित्याद्वारे संपूर्ण राज्यभर प्रचार केला. त्यांनी संत मार्ग पत्करून मानव जातीच्या कल्याणासाठी प्रवचन, कीर्तन आणि साहित्याद्वारे आदर्श जीवनपाठ घालून दिला. कनकदासांनी मानव कल्याणासाठी आयुष्य खर्ची घातले, असे मत चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …
Read More »निपाणी न्यायालयातील गैरसोय
नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी : आसन व्यवस्थेअभावी पक्षकार पायरीवर निपाणी (वार्ता) : शहरातील न्यायालय इमारत ही भव्य व दिव्य असुन नगरीच्या सौदर्यात व वैभवात भर घालणारी आहे. पण या न्यायालयात असणारी स्वच्छतागृहे न्यायालयात विविध कामासाठी येणारे पक्षकार योग्य प्रकारे न वापरल्याने तेथील अस्वच्छता पाहण्यासारखी झाली आहे. त्यामुळे तेथील स्वच्छता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta