Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

मौजे मत्तीवडे येथे ऊस दर आणि मोर्चाबाबत जनजागृती

  रयत संघटनेचे राजू पोवार यांचे मार्गदर्शन कोगनोळी : कर्नाटक सीमाभागासह महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 3 हजार रुपयांपर्यंत दर जाहीर करुन ऊसतोड सुरु केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा अशी मागणी …

Read More »

शैक्षणिक गुणवतेला प्राधान्य : शिक्षक आमदार प्रकाश हुक्केरी

  कुर्ली हायस्कूलला आमदार निधीतून मदत निपाणी (वार्ता) : शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत असतो. शालेय भौतिक विकास करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे मत शिक्षक आमदार प्रकाश हुक्केरी यांनी कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालय आरओ प्लॅन्ट मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी स्कूल बेटरमेंट कमिटी …

Read More »

आडी येथील शर्यतीत प्रभाकर होनमाने यांची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : आडी येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत प्रभाकर होनमाने -जुनून यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. तर अमर शिंदे- दानोळी यांच्या बैल जोडीने द्वितीय क्रमांक आणि प्रवीण बाळू सरकार- अरग यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनात चतुर्थ क्रमांक बंडा शिंदे -दानोळी यांच्या गाडीने पटकाविले. घोडेस्वार शर्यतीत …

Read More »

पाच हजार दिव्यांनी उजळले महादेव मंदिर

  कार्तिक दीपोत्सवानिमित्त कार्यक्रम : आयोध्यातील राम मंदिराची रांगोळी आकर्षण निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात रविवारी (ता.२६) रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त महादेव मंदिरसह सांस्कृतिक भवनात भाविकांनी ५ हजार दिवे लावले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. यावेळी आयोध्यामधील नियोजित राम मंदिराची रांगोळी दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले. …

Read More »

व्हीएसएम जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या आदेशानुसार येथील जी. आय. बागेवाडी उच्च प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या कन्नड आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आजच्या मोबाईल, टीव्हीच्या जमान्यात जुने खेळ आणि आजच्या मुलांसाठी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या …

Read More »

रविकांत तुपकर यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचा पाठिंबा

  निपाणी (वार्ता) : कापूस सोयाबीन आणि ऊसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी रविकांत तुपकर हे २८ नोव्हेंबर पर्यंत वाट पाहून २९ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयवर मोर्चा काढणार होते. याची माहिती मिळताच आंदोलन करण्यापूर्वीच शनिवारी (ता.२५) तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा निषेध करून कर्नाटक राज्य …

Read More »

रयत संघटनेच्या चिकोडी जिल्हाध्यक्षपदी मल्लाप्पा अंगडी यांची निवड

  निपाणी (वार्ता) : रायबाग तालुक्यातील हिडकल येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये चिकोडी जिल्हा रयत संघटनेच्या अध्यक्षपदी मल्लाप्पा अंगडी तर चिकोडी जिल्हा कार्याध्यक्षपदी विवेकानंद घंटी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. या प्रसंगी रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, रयत संघटनेचे …

Read More »

निपाणीत घराला आग लागून अडीच लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : येथील जुना पी. बी. रोड वरील बाळासाहेब ज्ञानदेव तराळे यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२४) घडली. या आगीत फ्रिज, टीव्ही, शिवायंत्र व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. याबाबत घटनास्थळावरून समजलेले अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री …

Read More »

निपाणीत रविवारी कार्तिक स्वामी दर्शन सोहळा

  निपाणी (वार्ता) : त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर येथील आश्रय नगरातील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये रविवारी (ता. २६) दुपारी ३:५३ ते सोमवारी (ता. २७) दुपारी १.३५ वाजेपर्यंत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कार्तिक स्वामी मंदिरातर्फे करण्यात आले आहे. शहरामधील आश्रयनगर येथे कार्तिक स्वामी मंदिर …

Read More »

ऊस दरासाठी ७ रोजी विधानसौधला घेराओ

  राजू पोवार ; रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : मागील सरकारने ऊसाला प्रति टन १५० रुपये जाहीर केले होते. त्याची अजूनही पूर्तता केलेली नाही. यंदाच्या हंगामात उसाला कारखान्यांनी ३५०० रुपये व सरकारने २ हजार रुपये द्यावे, या मागणी साठी रयत संघटना आक्रमक बनली आहे. वारंवार निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष …

Read More »