Wednesday , April 22 2026
Breaking News

रयत संघटनेच्या चिकोडी जिल्हाध्यक्षपदी मल्लाप्पा अंगडी यांची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : रायबाग तालुक्यातील हिडकल येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये चिकोडी जिल्हा रयत संघटनेच्या अध्यक्षपदी मल्लाप्पा अंगडी तर चिकोडी जिल्हा कार्याध्यक्षपदी विवेकानंद घंटी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
या प्रसंगी रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, रयत संघटनेचे कार्य पाहून संघटनेमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत संघटनेच्या माध्यमातून काम करण्यासाठी प्रत्येकाने वेळ देणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे संघटित राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नूतन पदाधिकाऱ्यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, वासू पढरोळी, महादेव हुलकर, मायप्पा लोरुरे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *