Monday , September 21 2026
Breaking News

व्हीएसएम जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या आदेशानुसार येथील जी. आय. बागेवाडी उच्च प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या कन्नड आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आजच्या मोबाईल, टीव्हीच्या जमान्यात जुने खेळ आणि आजच्या मुलांसाठी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरांची आठवण करून देण्यासाठी हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. चर्च, मशीद, जिनालय, बौद्ध मंदिरे, जाती, धर्मांचे पंथ, छत्रपती शिवाजी महाराज, बाराव्या शतकातील अनुभव मंडप अशा कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.
यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस मदनावर, मुख्याध्यापक
वाय. बी, हंडी, व्हीएसएम गर्ल्स हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक जी. एम.कमते, व्हीएसएमएस कन्नड आणि मराठी मेडियम कॉन्व्हेंट स्कूलचे मुख्याध्यापक डी. के.नाईक, एन. जी. मोकाशी,
जे. बी. जोशी, एम. के. मगदूम, पूजा कोतमिरे, एस.
एम. संकपाळ, के. बी. बडिगेर यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *