राजू पोवार; चांद शिरदवाडमध्ये जागृती मेळावा निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. तर कारखानदाराकडूनही ऊसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडत आहे. त्यामुळे ऊसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे. त्यासाठी ऊस दरासाठी जागृत होऊन सर्व शेतकऱ्यांनी जात पात -पक्ष विसरून …
Read More »गुन्हे रोखण्यासाठी सहा हजार सीसी कॅमेरे बसवणार
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना अभिवादन बंगळूर : गुन्हेगारी कृत्ये दूर करण्यासाठी शहराव्यतिरिक्त राज्याच्या विविध भागात सहा हजार सीसी कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. शहरातील सीएआर मुख्यालय परिसरात पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते अपघातातील जखमींना मदत …
Read More »बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण : सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात मागितली दाद
राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवण्याच्या प्रकरणात पुन्हा एकदा अडचणीत आले असून सीबीआयने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. भाजप आमदार यत्नाळ यांच्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देत अर्ज दाखल केला. सरकारने सीबीआय चौकशीला दिलेली …
Read More »उद्या आमदारांच्या हस्ते होणार खानापूर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन..
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये, महात्मा गांधी ग्रे वॉटर मॅनेजमेंट योजनेतून मंजूर झालेल्या, 3,45,78,000. (3 कोटी 45 लाख 78 हजार) रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते उद्या मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. पारीश्वाड या ठिकाणी 99 लाख 49 हजार रुपयाच्या योजनेचे …
Read More »ईडीचा मुडा कार्यालयात ३० तास तपास
समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची माहिती बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) संदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चौकशी करत आहे. एजन्सीने मुडा कार्यालयात जवळपास ३० तासांची व्यापक झडती घेतली. म्हैसूरमधील मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यादरम्यान सुरक्षा …
Read More »दोन कोटी फसवणुक प्रकरण : वाटाघाटीनंतर जोशींच्या भावाविरुध्दचे प्रकरण घेतले मागे
बंगळूर : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ गोपाळ जोशी, बहीण विजयालक्ष्मी आणि गोपाळ यांचा मुलगा अजय यांच्या विरोधात दोन कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल करणाऱ्या सुनीता चव्हाण (वय ४८) यांनी अखेर तडजोडीनंतर दाखल केलेला गुन्हा मागे घेतल्याचे कळते. धजदचे माजी आमदार देवानंद फुलसिंग चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण …
Read More »मुडा घोटाळा : दुसऱ्या दिवशीही ईडीची तपासणी सुरूच
कागदपत्रांची जोरदार झडती बंगळूर : मुडा बेकायदेशीर घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात, ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुसऱ्या दिवशीही मुडा कार्यालयावर छापे टाकले आणि तपास सुरूच ठेवला. मुडामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीरपणा आहे. ५०:५० च्या प्रमाणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनाही भूखंड वाटप करण्यात आला आणि या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमाई …
Read More »२ कोटींचा तिकीट घोटाळा प्रकरण : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक
बंगळूर : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ आणि त्यांच्या मुलाला गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान २ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. भाजपचे माजी आमदार देवानंदसिंह चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांच्या तक्रारीनंतर बंगळुरच्या बसवेश्वरनगर पोलिसांनी प्रल्हाद जोशी यांचा मोठा भाऊ गोपाळ जोशी यांना कोल्हापुरात …
Read More »बाळूमामा व बालाजीनगरातील प्लॉट विक्रीस बंदी
निपाणी : निपाणी मुरगूड रस्त्यानजीक असणाऱ्या बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील रहिवाशांना मूलभूत सुविधा न दिल्यामुळे या दोन नगरा मधील प्लॉट विक्री करण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. तसे पत्र चिकोडीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी निपाणीच्या उपनिबंधकांना दिले आहे. बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील रहिवाशांना गेल्या अकरा वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित …
Read More »“मातृभाषा शाळा अभियान” संदर्भात सर्व भाषिकांची 27 रोजी एकत्रित बैठकीचे आयोजन
खानापूर : तालुक्यातील सर्व मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकवणे व वाचवणे या संदर्भात “मातृभाषा शाळा अभियान” राबविण्यात येत असून रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता खानापूर येथील श्री शिवस्मारक सभागृहात तालुक्यातील सर्व भाषिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शाळांच्या एसडीएमसी कमिटीचे पदाधिकारी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta