निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथराव घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुशाप्पा पाटील उपस्थित होते. सचिव अशोक तोडकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दादासो पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. मासा …
Read More »निपाणी – सुळगाव बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता बस आहे. पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी पोहचण्यास रात्री उशिरा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी वरील वेळेऐवजी सायंकाळी ५:१० वाजता बस सोडून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते आगार प्रमुख संगाप्पा यांना …
Read More »नियती फाऊंडेशनतर्फे खानापूर न्यायालयात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण
खानापूर : नियती फाऊंडेशन आणि गुरुदेव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 22 जुलै रोजी खानापूर न्यायालय आवारात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेएमएफसी प्रधान दिवाणी न्यायाधीश विरेश हिरेमठ हे उपस्थित होते. यावेळी बसवराज हपळ्ळी, ऍड. आर. एन. पाटील यांच्यासह वकील वर्ग, …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच दत्त कारखान्याचा ध्यास
सदलगा शहरातील प्रचार सभेत माननीय उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे मत सदलगा : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोळच्या २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांसाठी २४ जुलै रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काल सदलगा शहरातील महादेव मंदिराच्या अक्कमहादेवी कल्याण सभा मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या समवेत प्रचार सभा …
Read More »संभाव्य पुराच्या धोक्यामुळे शेकऱ्यांकडून जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरित
चिक्कोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकसंबा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकसंबा -दत्तवाड परिसरातील शेतकरी आपली जनावरे अन्यत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे …
Read More »हुबळी येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची भीषण हत्या
हुबळी : हुबळी ईश्वर नगर येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांतून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैष्णव देवी मंदिराचे पुजारी देवप्पाज्जा यांचा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी देखील एका पुजाऱ्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पण …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट
शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यातील विविध भागात पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री रविवारी सुट्टीच्या दिवशीही विश्रांती न घेता जिल्हा दौऱ्यावर गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, त्यांनी कारवार जिल्ह्यातील शिरुर येथील दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच …
Read More »खानापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच; चापगाव येथे अनेक घरांची पडझड
खानापूर : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस रविवारीही कायम होता. कणकुंबी, जांबोटी, भीमगड, लोंढा, नागरगाळी वनपरिक्षेत्रात नेहमीप्रमाणे पाऊस सुरू असून संततधार पावसामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. भीमगड अभयारण्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे भांडुरी भरला आहे. त्यामुळे देगाव-हेमाडगा आणि पाली-मेंडील गावांमधील रस्ता आणि पुलावरून अनेक फूट पाणी वाहत आहे. …
Read More »बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजला 22 व 23 रोजी सुट्टी
बेळगाव : बेळगाव, खानापूर परिसरात सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 34 (एम) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या आणि पदवीधरपूर्व (12 वी पर्यंत) बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार दिनांक 22 व मंगळवार …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांनी केला खानापूर तालुक्यातील विविध भागांचा पाहणी दौरा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि नदी-नाल्यांची पाणी पातळी तपासली. तालुक्यातील कुसमळी गावातील पुलाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta