जमिनीचे आरोग्यही बिघडले कोगनोळी : अलीकडे शेतीमध्ये तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरांपेक्षा कमी खर्चात मरणारे तण आणि दिवसभर मजुरांच्याकडून काम करुन घेण्यासाठी करावी लागणारी दगदग यामुळे प्रत्येकजण सहजासहजी उपलब्ध होणारे आणि अलीकडच्या विद्युत फवारणी पंपांच्यामुळे कमी त्रासात होणारे काम म्हणून तणनाशकच वापरु लागला आहे. त्यामुळे साहजिकच शेतमजुरांचा …
Read More »मोफत विजेसाठी विणकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत जनस्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समस्याबाबत नागरिकांनी शहर व तालुक्यातील विविध संघटना, नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिली. माणकापूर पॉवरलूम असोसिएशनतर्फे वीज दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, विणकारांची थकीत वीज बिले माफ करावीत. २० अश्वशक्ती पर्यंत …
Read More »बंगळूर – पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे आजपासून सुरू
बेळगाव : प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर आणि पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार या विशेष रेल्वे सेवेचा आज प्रारंभ होत आहे. रेल्वे क्र. 06501 बेंगलोर येथून आज 29 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:35 …
Read More »निपाणी तालुक्यातील मराठी भाषिकांची एकजूट महत्वाची
निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण घटक समिती (ग्रामीण)ची व्यापक बैठक संपन्न निपाणी : निपाणी तालुक्यातील तमाम मराठी भाषिकांची व्यपाक बैठक मत्तीवडे ता. निपाणी येथे प्रा. डॉ. भारत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीला उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील यांनी केले. प्रस्तावना अजित पाटील यांनी केली. बैठकीचा उद्देश स्पष्ट …
Read More »खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या ‘टॉप टेन’ विद्यार्थ्यांचा गौरव
खानापूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या यशस्वी गुनानुक्रमे पहिल्या दहा विद्यार्थ्यांचा मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने रोख रक्कम प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरिण्यात आले. जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास बेळगावकर हे होते. सुरुवातीला विद्यालयातील …
Read More »शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी तालुका पंचायत कार्यालयावर मोर्चा
निपाणी (वार्ता) : गोकाक येथील तालुका पंचायतीचे अधिकारी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत. त्याशिवाय कलारकोप्प येथील रायाप्पा गौडपन्नावर यांच्या शेतीत ग्रामविकास अधिकारी आणि तालुका पंचायतीमधील अधिकाऱ्यांच्या संगणमताने घर बांधण्यात आले आहे. शिवाय सदरचे घर दुसऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य …
Read More »करणीबाधा करण्यासाठी चक्क जिवंत डुक्कराचा वापर!
खानापूर : खानापूर-हेम्मडगा रस्त्यावर रूमेवाडी क्रॉसनजीक विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांच्या शेतात करणीबाधेचा प्रकार उघडकीस आला असून चक्क डुकराला जिवंत पुरण्यात आल्याचे दिसून आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर-हेम्मडगा रस्त्यावर रूमेवाडी क्रॉसनजीक विलास बेडरे व ज्योतिबा बेडरे यांची शेत आहे. दोघे बंधु नेहमीप्रमाणे आपल्या शेतात …
Read More »डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडा
चंद्रशेखर स्वामीजींचे सिध्दरामय्या यांना आवाहन बंगळूर : सर्वजण मुख्यमंत्री झाले, डी. के. शिवकुमार यांना मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपले मुख्यमंत्रीपद सोडून डी. के. शिवकुमार यांना संधी द्यावी, असे आवाहन विश्व वक्कलीग महासंस्थान मठाचे श्री चंद्रशेखर स्वामीजी यांनी केले आहे. नाडप्रभू केम्पेगौडा हेरिटेज साईट डेव्हलपमेंट …
Read More »देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला; खासगी बस-ट्रकची धडक, १४ ठार
हावेरी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पहाटे सदर अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजते की, शिवमोग्गाहून मिनी बसने काही भाविक बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी …
Read More »पोक्सो प्रकरण: येडियुरप्पा विरोधात सीआयडीकडून न्यायालयात आरोपपत्र
बंगळूर : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध सीआयडी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या आईने सदाशिवनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी येडियुरप्पा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta