Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या ‘टॉप टेन’ विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

 

खानापूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खानापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या यशस्वी गुनानुक्रमे पहिल्या दहा विद्यार्थ्यांचा मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने रोख रक्कम प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरिण्यात आले.
जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास बेळगावकर हे होते.
सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉ. प्रा. गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले तर शिवाजी हसनेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुरेश पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले.
प्रारंभी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य विलास बेळगावकर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उ्द्घटन केले. तर जांबोटी हायस्कूलचे सहायक शिक्षक डी. आर. पाटील यांनी पुष्पहार घालून सरस्वती प्रतिमेचे पूजन केले आले.
यावेळी विलास बेळगावकर, सुनील चिगुळकर, डॉ. प्रा. गोपाळ पाटील यांचा हस्ते गुणी विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी कणकुंबी येथील श्री माऊली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी व डी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर विलास बेळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
मराठी भाषा प्रेरणा मंचचे सचिव अरुण कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अभियंता अशोक चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *