Tuesday , November 24 2026
Breaking News

कर्नाटक

कुन्नूरमधील तावदारे वाड्यातील मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त आठवडाभर कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : श्री. क्षेत्र कुन्नूर (ता.निपाणी) येथील तावदारे वाड्यामध्ये मंगळवार (ता.१०) ते सोमवार अखेर महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे. दररोज महाअभिषेक, नामजप आणि जप, दीपोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत. तरीपरिसरातील भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सोहळ्यानिमित्त मंगळवारी (ता.१०) सायंकाळी …

Read More »

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निपाणी फाउंडेशनतर्फे श्रद्धांजली

  ​निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक विमान दुर्घटनेत निधन झाल्याच्या धक्कादायक घटनेमुळे सीमाभागासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. निपाणी फाउंडेशन तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ​प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली. कॉम्रेड ​चंद्रकांत खराडे, विठ्ठल …

Read More »

संकेश्वरातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षे कारावास; १ लाख रुपये दंड

  संकेश्वर : संकेश्वर शंकर नगर येथील आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय २३) याने अल्पवयीन मुलीला (बालिकेला) प्रेमाचे आमिष दाखवून दुचाकीवरून अपहरण करून अत्याचार (बलात्कार) केल्याचे प्रकरण संकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवशरण अवजी यांनी आरोपी दर्शन हुणश्याळी याला गजाआड करुन पोक्सो कायद्याअंतर्गत …

Read More »

ग्रामदैवत महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त निपाणीत शुक्रवारपासून दळप, कांडप गिरण्या बंद

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची रविवारची यात्रा आणि नूतन मंदिराचा वास्तुशांती सोहळ्याला मंगळवारपासून (ता.३) सुरूवात झाली आहे. ही यात्रा बुधवारपर्यंत (ता. ११) साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात शहर आणि उपनगरातील दळप, कांडप गिरण्या बंद राहणार आहेत. या काळात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन निपाणी शहर …

Read More »

निपाणीतील शेट्टी सराफांनी बनविली गुलबर्ग्यातील अनवीर भद्रेश्वर देवाची २० किलोची चांदीची पालखी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अशोक नगरातील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी यांच्या सराफ दुकानात गुलबर्गा जिल्ह्यातील अनवीर भद्रेश्वर देवालयातील २० किलो ४१० वजनाची पालखी बनविण्यात आली आहे. त्यासाठी १५ कारागीरांनी तीन महिने परिश्रम घेतले आहेत. ही पालखी आकर्षक झाल्याची माहिती देवस्थानचे पृथ्वीराज पाटील, सिद्धलिंग क्षेमशेट्टी यांनी सांगितले. चांदीची पालखी बनवण्यासाठी …

Read More »

बोरगांव प्राथमिक ग्रामीण कृषी संघातर्फे मयत सभासदांच्या वारसांना लाखाची मदत

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथीलविविधोद्देशिय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाचे सभासद शिवानंद बाबू माळी यांचे नुकत्याच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदार मातोश्री आक्काताई बाबू माळी यांना विमा कंपनीकडून १ लाखाचा मदतीने मंजूर झाला होता. रक्कमेच्या धनादेशाचे वितरण अरिहंत सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात …

Read More »

सरकार असहाय्य नाही, संविधानानुसारच कारभार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  राज्यपालांचे भाषण न वाचणे असंवैधानिक बंगळूर : सरकार चुकीच्या मार्गावर नाही आणि मी असहाय्य मुख्यमंत्री नाही, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण वाचले नाही. त्यांनी केवळ सुरुवातीची तीन वाक्ये …

Read More »

गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी करण्याची अजूनही संधी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बंगळूर : राज्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत सुमारे ५२ हजार लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. मात्र, त्यापैकी २० हजार लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या असून उर्वरित प्रकरणे येत्या काळात निकाली काढली जातील, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. प्राप्तिकर व जीएसटी न भरणाऱ्या पात्र महिलांना गृहलक्ष्मी योजनेत …

Read More »

वडैबैल येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिर जीर्णोद्वार; चौकट पूजन, माहेरवाशीयांचा सत्कार सन्मान कार्यक्रम

  खानापूर : श्री महालक्ष्मी मंदिर वडैबैल कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी गावामध्ये सहवाद्य चौकट मिरवणूक व श्रींचे विधिवत आरती-पूजन असा दिवसभराचा भक्तिभावपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी श्री चव्हाटा मंदिर येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक इंगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न …

Read More »

निपाणी मतदारसंघाच्या विकासात जोल्ले दांपत्यांचे योगदान

  चांद शिरदवाडमध्ये गंगा कल्याण योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू म्हणून आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले हे कार्यरत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते, गंगा कल्याण, पाणी योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजना तळागाळातील …

Read More »