Monday , June 1 2026
Breaking News

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निपाणी फाउंडेशनतर्फे श्रद्धांजली

Spread the love

 

​निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक विमान दुर्घटनेत निधन झाल्याच्या धक्कादायक घटनेमुळे सीमाभागासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. निपाणी फाउंडेशन तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
​प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.
कॉम्रेड ​चंद्रकांत खराडे, विठ्ठल वाघमोडे, प्रा.​नानासाहेब जामदार, प्रा. एन. आय. खोत,​ जयराम मिरजकर,​ प्रशांत गुंडे व आनंद संकपाळ, ​कबीर वराळे, बाबासाहेब मगदूम यांच्यासह मान्यवरांनी मनोगतातून प्रशासनावरील पकड आणि विकासाचा ध्यास’ अजितदादा पवार यांना होता. राजकारणातील एक संवेदनशील माणूस आपण गमावला आहे. दादा म्हणजे ‘शब्दाचा पक्का आणि कामाचा माणूस’ अशा शब्दांत आपल्या भावना मांडल्या.​ यावेळी निपाणी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *