Monday , September 21 2026
Breaking News

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष

Spread the love

 

बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील 7 खटल्यांपैकी 5 वा खटला देखील आज निकालात निघाला असून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील सातव्या खटल्यातील 10 आरोपींपैकी एकाचे निधन असले तरी त्याच्यासह इतर 9 जणांना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष ठरवले आहे.

निर्दोष झालेल्यात कुमार मासेकर, केदारी पाटील, नंदू कुगजी, राहुल अष्टेकर, नामदेव कदम, राजू नायकोजी, सुधीर धामणेकर, जयसिंह अष्टेकर, प्रकाश कुगजी यांचा समावेश आहे.

आरोपींच्यावतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. श्याम पाटील यांनी काम पाहिले. आता उर्वरित 122, 125/15 या दोन खटल्यांचे कामकाज सध्या सुरू आहे. जुलै 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य फलक हटवल्यानंतर झालेल्या लाठी हल्ल्यात मराठी भाषिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या केस बारा वर्षानंतर निकाली लागत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *