Monday , September 21 2026
Breaking News

कुन्नूरमधील तावदारे वाड्यातील मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त आठवडाभर कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री. क्षेत्र कुन्नूर (ता.निपाणी) येथील तावदारे वाड्यामध्ये मंगळवार (ता.१०) ते सोमवार अखेर महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे.
दररोज महाअभिषेक, नामजप आणि जप, दीपोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत. तरीपरिसरातील भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सोहळ्यानिमित्त मंगळवारी (ता.१०) सायंकाळी ७ वाजता सदलगा येथील शिवानंद मठ, गीताश्रमातील डॉ. श्रद्धानंद स्वामी यांचेआशीर्वचन, बुधवारी (ता. ११) सायंकाळी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील दीपकअण्णा महाराज यांचे आशीर्वचन, गुरुवारी संध्याकाळी व्हळी हिटणी येथील गुरुसिध्देश्वर मठातील
प्रभूलिंगेश्वर शिवाचार्य स्वामींचे आशीर्वाचन होणार आहे.शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी कब्बूर येथील गौरीशंकर मठातील रेवणसिद्धेश्वर स्वामी, शनिवारी (ता.१४) सायंकाळी
शिरगाव फाटा येथील सद्गुरु विश्व सेवाश्रम परणकुती तीर्थक्षेत्र शिवलिंग देवालयातील ईश्वरखुला रामदासी उर्फ ​​दादा महाराज यांचे आशीर्वाचन होणार आहे.
रविवारी पहाटे ६ वाजता निपाणी येथील विरूपाक्षलिंग देवस्थान समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत
सामूहिक लिंगपूजा व लिंग दीक्षा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता कोल्हापूर येथील ब्रह्मकुमार सेवा केंद्राच्या रघुनाथ भाईजजींचे आशिर्वचन होईल. सोमवारी (ता.१६) सकाळी अंबिल घागरींचे आगमन, १०.३० महाआरती ११ वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *