Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगांव प्राथमिक ग्रामीण कृषी संघातर्फे मयत सभासदांच्या वारसांना लाखाची मदत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथीलविविधोद्देशिय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाचे सभासद शिवानंद बाबू माळी यांचे नुकत्याच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदार मातोश्री आक्काताई बाबू माळी यांना विमा कंपनीकडून १ लाखाचा मदतीने मंजूर झाला होता. रक्कमेच्या धनादेशाचे वितरण अरिहंत सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
उत्तम पाटील यांनी, सहकारातून सामाजिक जबाबदारीची जाणीव जपण्याचा प्रयत्न अरिहंत उद्योग समूहाने नेहमीच केला आहे. गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासह तिच्या कुटुंबांची काळजी घेतली जात आहे. विविधोद्देशिय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघातर्फे सभासदांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
सभासदांच्या सुख-दुःखात त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच खरी सहकाराची भावना आहे. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून संघातर्फे समाजाभिमुख कार्य सुरूच राहणार आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ६ सभासदांच्या वारसदारांना विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे. ही योजना सभासद व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक आर. बी. पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, आप्पासाहेब बंकापुरे, दर्शन पाटील, राजू गजरे, सीईओ रावसाहेब चौगुले, राकेश फिरगण्णावर यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *