Sunday , July 26 2026
Breaking News

कपिलेश्वर मंदिरातर्फे रक्तदान शिबीर, अधिकृत वेबसाईटचे उदघाट्न

Spread the love

 

बेळगाव : श्री दक्षिण काशी कपिलेश्‍वर मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता.२) हे शिबिर झाले. यावेळी एकूण ७५ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यानंतर सायंकाळी मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उदघाट्न करण्यात आले.

यावेळी मंदिराचे अध्यक्ष राहूल कुरणे यांच्या हस्ते पुजा करून रक्तदान शिबिराला चांगला देण्यात आली. मंदिरातर्फे गरजु लोकांसाठी रक्तदान मिळावे यासाठी रक्तदान गट नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यावेळी एकूण १६० हून अधिक जणांनी नोंदणी केली. कपिलेश्‍वर मंदिरातर्फे पहिल्यांदाच हा उपक्रम झाला. यानंतर असे उपक्रम वारंवार करण्याचे नियोजन ठरले. पहिल्यांच केलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी केएलई हस्पिटलचे ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले. यावेळी मंदिराचे सचीव अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, राजू भातकांडे, अजित जाधव, राकेश कलघटगी, प्रथमेश कावळे, जोतिबा कावळे, अविनाश खन्नुकर, अभय लगाडे, प्रताप बाचोळकर, अभि पवार, महेश सांबरेकर, रमेश देसुरकर आदी सेवेकरी ट्रस्ट्री उपस्थित होते.

यानंतर सायंकाळी ७ वाजता कपिलेश्‍वर मंदिराच्या वेबसाईटचे उदघाटनही करण्यात आले. यावेळी मंदीर ट्रस्टी व इतर मान्यवर उपस्थित होते. ही वेबसाईट अमर हुंद्रे व सर्वेश चव्हाण पाटील यांनी तयार केली आहे. यावेळी अभिजीत चव्हाण यांनी या वेबसाईटबद्द्ल माहिती दिली. ऑनलाईनच्या माध्यमातून मंदिराची माहिती मिळत होती, मात्र योग्य माहिती मिळण्यासाठी हे माध्यम बनविण्यात आले आहे. मराठी, हिंदीसह विविध भाषामध्ये ही माहिती असून यामुळे इतर राज्यातील भक्तांनाही योग्य ती माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले. यानंतर मंदिरात पालखी व महाआरती झाली.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *