Monday , September 21 2026
Breaking News

वडैबैल येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिर जीर्णोद्वार; चौकट पूजन, माहेरवाशीयांचा सत्कार सन्मान कार्यक्रम

Spread the love

 

खानापूर : श्री महालक्ष्मी मंदिर वडैबैल कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी गावामध्ये सहवाद्य चौकट मिरवणूक व श्रींचे विधिवत आरती-पूजन असा दिवसभराचा भक्तिभावपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी श्री चव्हाटा मंदिर येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक इंगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री चन बसव देवरू, मठाधीश अवरोळी यांच्या पावन पदस्पर्शाने चौकट उद्घाटन व पूजन संपन्न होणार असून, या मंगलप्रसंगी त्यांचे पावन सानिध्य लाभणार आहे.

त्यानंतर चौकट बसविण्याचा विधी, तसेच माहेरवाशिणींचा सन्मान व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी स्थळ देवस्थान येथे मानाच्या ओट्या व नैवेद्य अर्पणाचा विधी संपन्न होणार आहे. अशा प्रकारे दोन दिवसांचा भव्य, पारंपरिक व भक्तिमय चौकट-पूजन सोहळा पार पडणार आहे.

या पावन प्रसंगी राज्याच्या बालकल्याण मंत्री मा. सौ. लक्ष्मी हेबाळकर, विधानपरिषद सदस्य मा. श्री. चनराज हट्टीहोळी, तालुक्याचे आमदार मा. श्री. विठ्ठलराव हलगेकर, श्री. सदानंद पाटील (एम.डी.), तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त सैनिक, शिक्षकवर्ग, माहेरवाशी बंधू-भगिनी, नातेवाईक व सर्व भाविक भक्तजन उपस्थित राहणार आहेत.

तरी सालाबादप्रमाणे आयोजित जत्रा, इंगळे कार्यक्रम, चौकट पूजन व माहेरवाशी सत्कार समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा गौरव करावा व सेवाभावी उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिर वडैबैल कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने विनम्रपणे करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *