Monday , April 20 2026
Breaking News

गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी करण्याची अजूनही संधी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 

बंगळूर : राज्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत सुमारे ५२ हजार लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. मात्र, त्यापैकी २० हजार लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात आल्या असून उर्वरित प्रकरणे येत्या काळात निकाली काढली जातील, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. प्राप्तिकर व जीएसटी न भरणाऱ्या पात्र महिलांना गृहलक्ष्मी योजनेत अजूनही नाव नोंदणी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान भाजप आमदार पी. एच. पूजार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, राज्यात सुमारे १.२६ कोटी लाभार्थ्यांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र आयकर व जीएसटी विभागांच्या नोंदींतील तांत्रिक त्रुटींमुळे काही लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचलेली नाही.

बागलकोट जिल्ह्यातील ७१२ लाभार्थ्यांना आयटी व जीएसटी भरत असल्याच्या कारणावरून योजनेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा पूजार यांनी उपस्थित केला होता. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही निधी न मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावर उत्तर देताना मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले की, आयकर व जीएसटी विभागांच्या नोंदींमध्येही तसेच तपशील दिसून येत असून या संदर्भात आयकर विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे. जीएसटी कौन्सिललाही ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली असून तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेली समस्या लवकरच दूर केली जाईल.

दरम्यान, बेळगाव येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात गृहलक्ष्मी योजनेच्या थकबाकीवरून विधानसभेत गोंधळ झाला होता. दोन महिन्यांची थकबाकी देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी थकबाकी भरण्यास विलंब झाल्याचे मान्य करत ती लवकरच दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *