Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

अक्कोळ येथे पंत महाराज बाळेकुंद्रीकर उत्सवानिमित्त उद्या विविध शर्यती

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील दिवंगत मलगौंडा नरसगौंडा पाटील (कट्टीकल्ले) यांनी सुरू केलेल्या श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा १०८ व्या उत्सवास शुक्रवारपासून (ता.१२) झाला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी (ता.१२) सकाळी १० वाजता अभिषेक, ओम नमः शिवाय जप, भजन व आरती, शनिवारी (ता.१३) रात्री आरती व भजन, रविवारी (ता.१४) सायंकाळी …

Read More »

निपाणीत उद्या सन्मान, कृतज्ञता सोहळा

  रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांचा सत्कार : शरद पवार यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंगळवारी (ता.१६) निपाणीत येत आहेत. त्यांच्या हस्ते सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांचा नागरी सत्कार तसेच तालुक्यातील उत्तम पाटील गटाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व कार्यकर्ता …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर’च्या कुर्ली शाखेतर्फे सत्कार समारंभ

  निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष विनायक तेली होते. शाखेचे संचालक कुमार माळी यांनी प्रास्ताविक केले. शाखा संचालक प्रदिप बुधाळे यांची कागल येथील सर पिराजिराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. …

Read More »

१७ जानेवारी रोजी हुतात्मा दिनानिमित्त कडकडीत हरताळ पाळा

  बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला राज्य कारभार कसा चालावा हे समजण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला व फाजल अली कमिशनची नियुक्ती करण्यात आली. त्या कमिशनने भाषावार प्रांतरचनेचा अहवाल दिनांक १६ जानेवारी १९५६ला जाहीर केला. त्या अहवालात बेळगांव, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, निपाणी, बीदर, भालकी, संतपूर हा …

Read More »

वेदगंगा नदी पुलावर भराव करू नये

  शेतकरी बचाव कृती संघर्ष समिती; ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यमगरणी जवळील वेदगंगा नदी पूल ते मांगूर फाटा पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यावेळी या परिसरात भराव घातला जाणार आहे. त्यामुळे परिसरासह महाराष्ट्रातील अनेक गावासह शेतींना पुराच्या पाण्याचा …

Read More »

क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा उत्सव ज्योतीचे निपाणीत स्वागत

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनातर्फे बुधवारी (ता. १७) होणाऱ्या क्रांतिवीर संगोळी रायाण्णा उत्सवानिमित्त उत्सवानिमीत्त मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रसार करण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील १५ तालुक्यातून क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा उत्सव ज्योतीचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी येथे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …

Read More »

लॉज कर्मचारी मृत्यूप्रकरणी बेळगावातील दोघांना अटक

  निपाणी (वार्ता) : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेरील हॉटेल गोल्डन स्टार लॉजमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पायरीवरून उतरताना तोल जाऊन पडल्याने कर्मचारी किरण गणपती भिर्डेकर (रा.भीमनगर तिसरी गल्ली,निपाणी) याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बाळाप्पा गुडगेनहट्टी (वय २५ रा. जोडीहाळ, बंबरगा ता. बेळगाव) व नितेश कित्तुर (वय २८ …

Read More »

युवकांनो शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करा

  आमदार राजू सेठ; निपाणी येथे सत्कार निपाणी (वार्ता) : मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून शैक्षणिक क्षेत्रातही म्हणावी तशी प्रगती नाही. त्यामुळे समाजाने याकडे लक्ष देऊन काम हाती घ्यावे. युवकांनी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करावी,असे आवाहन बेळगांव उत्तरचे आमदार व अंजुमन मुस्लिम बोर्डचे अध्यक्ष राजू सेठ यांनी …

Read More »

गरीबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाच हमींची अंमलबजावणी

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शिमोगा येथून ‘युवानिधी’ योजनेला चालना बंगळूर : आमच्या सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार पाच हमी योजनांची अंमलबजावणी केली असून गरीब आणि मध्यमवर्गीयांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने योजना जारी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सांगितले. शिमोगा येथील फ्रीडम पार्क येथे सहा बेरोजगार तरुणांना धनादेशाचे वाटप …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे यश

  निपाणी (वार्ता) : होसदुर्ग येथे दुसरी खुली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये फाईट, पूम्से व स्पीड पंच अशा स्वरूपात स्पर्धा झाल्या. त्यामध्ये येथील सद्गुरु अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सद्गुरू तायक्वांदो अकॅडमीला बेळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे चषक देऊन गौरविण्यात आले. शार्विन बिकणावर, सार्थक निर्मले, श्रीविराज मोहिते, बल्लाळेश्वर …

Read More »