Tuesday , June 2 2026
Breaking News

युवकांनो शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करा

Spread the love

 

आमदार राजू सेठ; निपाणी येथे सत्कार

निपाणी (वार्ता) : मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून शैक्षणिक क्षेत्रातही म्हणावी तशी प्रगती नाही. त्यामुळे समाजाने याकडे लक्ष देऊन काम हाती घ्यावे. युवकांनी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करावी,असे आवाहन बेळगांव उत्तरचे आमदार व अंजुमन मुस्लिम बोर्डचे अध्यक्ष राजू सेठ यांनी केले. कोरोना काळात आमदार शेठ यांनी केलेले सामाजिक कार्य व आमदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा येथील मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर अमन सेठ, नगरसेवक मुजमिल डोनी उपस्थित होते.
राजू सेठ म्हणाले, निपाणी मधील समाज बांधवानी एकोपा राहण्यासाठी काम करावे. सरकारी योजना सर्वांपर्यंत पोहचतील असे पाहावे. समाजासाठी निधी आहे पण त्याचा सदुपयोग होत नाही. युवकांनी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करण्याचे आवाहन केले.
यावेळी अल्ताफ कारी, हाफिज खलील, यासीन मौलाना यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, मैनुद्दीन मुल्ला, बक्तियार कोल्हापुरे, इरफान महात, शेरगुलखान पठाण, नजीर कोच्चरगी, फारुक पटेल, नजीर पकाली, यासीन चांदखान, इकबाल झारी, गौस पठाण, शरीफ बेपारी, गणीभाई पटेल, जावेद नाईक, राजू मुल्ला, वासिम देसाई, जावेद कोल्हापुरे, शौकत बागवान, मलिक जमादार, सोहेल बागवान, करीम बागवान, सरफराज सय्यद, फैयाज पठाण, जुबेर बागवान, सद्दाम नगारजी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. निपाणी मुस्लिम समाज अध्यक्ष बक्तियार कोल्हापुरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

भ्रष्ट कर्मचाऱ्याची बदली न केल्यास नगरपालिकेसमोर उपोषण

Spread the love  आयुक्तांना दिले निवेदन; उतारे देण्यासाठी रकमेची मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *