Monday , September 21 2026
Breaking News

‘महात्मा बसवेश्वर’च्या कुर्ली शाखेतर्फे सत्कार समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष विनायक तेली होते.
शाखेचे संचालक कुमार माळी यांनी प्रास्ताविक केले.
शाखा संचालक प्रदिप बुधाळे यांची कागल येथील सर पिराजिराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. कृष्णा मगदुम यांची कुर्ली शाखेच्या संचालकपदी निवड, कुर्ली गावचे उद्योजक सुनिल माळी यांना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय माळी समाज युवा उद्योजक संघटनेतर्फे उद्योगरत्न हा पुरस्कार देण्यात आला. तर अनिल नवाळे यांची निपाणी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाखा उपाध्यक्ष बाळासाहेब वैराट, संचालक वसंत बुधाळे, किरण निकाडे, हरी निकाडे, प्रदीप बुधाळे, अमोल माळी.
रविंद्र चौगुले, सुधाकर व्हराटे, यशवंत पोवार, पांडूरंग पाटील, रामचंद्र हेरवाडे, बाबुराव पाटिल, नितीन पाटील, सुधीर साळवे, टी. के. जगदेव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. शाखाधिकारी मारूती जाधव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *