प्रांतांधिकाऱ्यांचे आदेश : जागा मालकांना देणार नोटीस निपाणी : कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील बालाजीनगर वसाहतीत जागा मालकाच्या मनमानीमुळे नियमबाह्य प्लॉटविक्री झाल्यामुळे आजपर्यंत येथे कोणत्याच नागरी सुविधा मिळाल्या नसल्याची तक्रार रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर गुरुवारी चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी अधिकाऱ्यांसह बालाजीनगरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांनी …
Read More »कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रशासनाला इशारा..
बेळगाव : बेळगावात गेल्या काही दिवसांपासून कन्नड नामफलकांची सक्ती करून व्यापाऱ्यांना, मराठी भाषिकांना वेठीस धरणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर येत्या २५ जानेवारीच्या आत कठोर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बेळगावसह राज्यात दुकाने, व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याची मागणी …
Read More »प्लंबिंग करताना विद्युत भारित विजेचा धक्का लागून वड्डेबैलचा युवक जागीच ठार!
खानापूर : हनुमान नगर बेळगाव येथे प्लंबिंग कामासाठी गेलेल्या खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथील एका प्लंबर कामगाराचा विद्युतभारित विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव महेश परशराम पाटील (वय 21 वर्षे) राहणार वड्डेबैल ता. खानापूर असे आहे. …
Read More »‘जिनधर्म प्रभावक’ पदवीने सहकाररत्न रावसाहेब पाटील सन्मानित
निपाणी (वार्ता) : बंगळूर कर्नाटक जैन असोसिएशनतर्फे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील यांना ‘जिनधर्म प्रभावक’ पदवीने सन्मानित करण्यात आले. रावसाहेब पाटील यांच्या अनुपस्थितीत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळूर येथील कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला. दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून रावसाहेब पाटील यांनी गेल्या १५ वर्षापासून कर्नाटक-महाराष्ट्रात जैन …
Read More »संभाजीनगर, शिंदे नगर मधील समस्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील प्रभाग क्रमांक १९ मधील संभाजीनगर आणि प्रभाग क्रमांक २० मधील शिंदे नगरमध्ये ४ हजार लोकसंख्या आहे. पण या दोन्ही नगरामध्ये सार्वजनिक शौचालये रस्ते अंगणवाडी अभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नगरपालिकेला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून आपण या दोन्ही नगरामध्ये भेट …
Read More »समाजातील औरंगजेबांना रोखा : रमाकांत कोंडुसकर
निपाणीत संभाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण निपाणी (वार्ता) : धर्मासाठी बलिदान कसे द्यावे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्ववावरून दिसून येते. युवा पिढीने त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्याचे आचरण करावे. भारत मातेचे सौभाग्य टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. असे असताना केवळ स्वार्थासाठी महापुरुषांची नावे घेणे चुकीचे आहे, असे मत श्रीराम …
Read More »व्यवस्थापनाचे निर्णय प्रगतीसाठी दिशादर्शक
डॉ. सी. बी. कुरबेट्टी; ‘महात्मा बसवेश्वर’ची त्रैमासिक सभा निपाणी (वार्ता) : संस्थेची प्रगती ही तेथील व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यवस्थापनाने घेतलेले बरे-वाईट निर्णय संस्थेच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरतात, असे मत येथील महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. येथील गांधी चौक येथील व्यंकटेश मंदिरात झालेल्या …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव : 16 जानेवारी 1956 रोजी भाषावार प्रांतरचनेची घोषणा झाली आणि मराठी बहुल भाग तत्कालीन मैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याच्या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी मराठी भाषिक रस्त्यावर उतरले व मोठा जनक्षोभ उसळला. त्यावेळी झालेल्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात सीमा भागातील अनेकांना बलिदान प्राप्त झाले. 17 जानेवारी रोजी या हुतात्म्यांना …
Read More »निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील
उपाध्यक्षपदी नवाळे, सचिवपदी खोत यांची निवड निपाणी (वार्ता) : तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अनिल नवाळे व सेक्रेटरीपदी सोमनाथ खोत यांची एकमताने निवड करण्यात आली. शनिवारी तालुका पत्रकार संघाचा कार्यक्रम जवाहरलाल तलाव येथील फिल्टर हाऊस परिसरात झाला. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अमर गुरव, उपाध्यक्ष …
Read More »बोरगाव जनता पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी शंकर माळी, उपाध्यक्षपदी मुरारी ऐदमाळे निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील जनता को- ऑप क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गोविंदगौडा पाटील यांनी केली. सर्व संचालकांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष शंकर माळी, उपाध्यक्षपदी मुरारी ऐदमाळे यांची निवड करण्यात आली. नवीन निवड झालेल्या संचालकामध्ये अण्णासाहेब पाटील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta