Sunday , July 26 2026
Breaking News

बोरगाव जनता पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

Spread the love

 

अध्यक्षपदी शंकर माळी, उपाध्यक्षपदी मुरारी ऐदमाळे

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील जनता को- ऑप क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गोविंदगौडा पाटील यांनी केली. सर्व संचालकांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष शंकर माळी, उपाध्यक्षपदी मुरारी ऐदमाळे यांची निवड करण्यात आली. नवीन निवड झालेल्या संचालकामध्ये अण्णासाहेब पाटील, प्रदीप माळी, कुमार पाटील, देवगौडा पाटील, बाहुबली अम्मन्नवर, भीमगौडा पाटील, रावसाहेब पचंडी, कल्लाप्पा पुजारी, शकील अपराज, बाबासाब कोरे, ललिता माळी, संगीता माळी यांचा समावेश आहे.
अध्यक्ष शंकर माळी यांनी, सर्वांच्या सहकार्याने संस्थेची घोडदौड सुरू आहे. गेल्या 25 वर्षात संस्थेने सभासदासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यांच्या विश्वासामुळेच निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगितले. नूतन संचालक नगरसेवक प्रदीप माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यवस्थापक धनंजय काकडे, प्रकाश माळी, सुरेश सोमाने, विकास माळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *