खानापूर : खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावात विद्युतभारित तर तुटून दुचाकी जळून खाक झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. खानापूर हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. एक मोठी विद्युतभारीत तार दुचाकीवर तुटून पडल्याने दुचाकीस्वार बेशुद्ध अवस्थेत दुचाकीसह घसरला. या …
Read More »आमदार विठ्ठल हलगेकरांनी मराठीतून मांडल्या खानापूरच्या समस्या!
खानापूर : खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज विधानसभेत मराठी भाषेत खानापूर तालुक्याच्या समस्या मांडून त्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा सुरु राहिली. या दरम्यान, विविध आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. या दरम्यान, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्याला …
Read More »महात्मा गांधी शांती पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित
निपाणी (वार्ता) : भुवनेश्वर (ओडीसा) येथील एमजीजीपी फाऊंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालय, अर्जुनी (ता. कागल) येथे कार्यरत असेलले आणि निपाणी येथील रहिवासी नामदेव चौगुले यांना महात्मा गांधी जागतिक शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौगुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयक करीत असलेल्या कार्याची नोंद घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान …
Read More »विज्ञान साहित्य संमेलन जागृतीचे प्रभावी माध्यम; अंजली अमृतसमन्नावर यांची माहिती
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात निकोप समाज निर्मितीसाठी विज्ञान जागृती करण्याच्या हेतूने कुर्ली येथील एच जे सी चिफ फौंडेशन सतत २० वर्षे कार्य करीत आहे. ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारे उपक्रम आयोजित केले जातात. त्याचा या परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक याना फायदा होत आहे. …
Read More »काँग्रेसच्या डिनर पार्टीत तीन भाजप आमदारांची उपस्थिती
काँग्रेस प्रवेशाची चर्चा; भाजपकडून गंभीर दखल बंगळूर : बेळगावात काल रात्री उशिरा झालेल्या काँग्रेस आमदारांच्या डिनर पार्टीत भाजप आमदारांच्या सहभागावरून राजकीय दृष्ट्या वेगवेगळे अन्वयार्थ लावले जात आहेत. पार्टीत उपस्थित तीन आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा असून प्रदेश भाजपनेही याची गंभीर दखल घेतली आहे. बेळगाव शहराच्या हद्दीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये …
Read More »निपाणीकरांचे नव्या तलावाचे स्वप्न लवकरच पूर्ण; नगरसेवक विलास गाडीवड्डर
अभियंते श्रीकांत मकाणी यांची भेट निपाणी (वार्ता) : शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी नवीन तलाव निर्मितीच्या कामासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एम. एस. भोसराज यांची बेळगांव विधानभवनात भेट घेतली. प्रशासनाने या कामास सकारात्मक प्रतिसाद देत तलाव निर्मीर्तीच्या जागेचा सर्व्हे करण्याचा २४ तासात …
Read More »रयत संघटनेच्या आंदोलनाला यश; मुख्यमंत्र्यांसमवेत केली चर्चा
पुढील बैठकीसाठी बंगळूरमध्ये बैठकीचे निमंत्रण निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनाने बेळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. ऊसाला कारखान्यांनी प्रति टन ३५०० आणि सरकारने २००० रुपये द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य संघटनेने आंदोलन छेडले होते. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी …
Read More »मतदारसंघात निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याचा विचार व्हावा
राजेंद्र वडर ; कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी निपाणी (वार्ता) : गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा संघर्ष झाला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांना सोडून धनशक्तीच्या मागे गेले. केवळ निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्तेच शिल्लक राहिले. स्वतःकडून पैसा खर्च करून काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न …
Read More »स्तवनिधी हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांसाठी गणित मार्गदर्शन शिबिर
निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ संचालित, पी. बी. आश्रम स्तवनिधी मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल येथे दहावी विद्यार्थ्यांसाठी गणित विशेष मार्गदर्शन शिबिर झाले. श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना ट्रस्टच्या डॉ. वीरेंद्र हेगडे ज्ञान विकास संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील होते. एस. एस. …
Read More »राज्यातील शेतकऱ्यांना आठवडाभरात दुष्काळ निवारण निधी
मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची विधानपरिषदेत माहिती बेळगाव : दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांपर्यंतची दुष्काळ निवारण मदत या आठवड्याभरात व्यावहारिकरित्या दिली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी विधान परिषदेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान काँग्रेस सदस्य राजेंद्र राजण्णा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta