Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

पतीचा गळा आवळून खून; खानापूरातील घटना

  खानापूर : खानापूर तालुक्यातील चिक्कमन्नोळी येथे पत्नीने पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील चिक्कमन्नोळी येथील रहिवासी बाबू कलाप्पा कर्की (48) याला दारूचे व्यसन जडले होते. त्याने शेती गहाण ठेवून कर्ज काढले होते. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्या त्रासाला …

Read More »

खानापूर म. ए. समितीचे काळ्या दिनी लाक्षणिक उपोषण

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर काळा दिनी शिवस्मारक येथील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करून त्यानंतर निषेधसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक …

Read More »

कोगनोळी येथे दिवसभर पोलिस बंदोबस्त

  वाहनांची तपासणी : चारचाकी वाहनांवर नजर कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक पोलिसांच्या वतीने दिवसभर बंदोबस्त ठेवला होता. 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्याचा राज्योत्सव असला तरी मराठी भाषिक लोक काळा दिन म्हणून साजरा करतात. लगतच असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक नेते बेळगावला जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा देणार …

Read More »

हालसिद्धनाथ यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता

  कडक पोलिस बंदोबस्त : पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोगनोळी : कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हालसिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरण संपन्न झाली. मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शनिवार (ता. 28) रोजी सकाळी कुरली येथील हालसिद्धनाथ मंदिरात मानकरी …

Read More »

निपाणीत शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणीक उपोषण

  निपाणी (वार्ता) : संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी जन आंदोलन सुरु आहे. याशिवाय मराठा समाजाचे मनोज जरांगे -पाटील हे आंतरवली (जि. नांदेड) येथे आमरण उपोषण करीत आहेत. या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला निपाणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यासाठी मराठा समाजातर्फे शुक्रवारी …

Read More »

न्यायालय मराठी भाषिकांना योग्य न्याय देईल

  निपाणीत मराठी भाषिकांची मागणी : काळा दिन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : सर्वोच्च न्यायालयाबाबत प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे. न्यायालय मराठी भाषिकांना योग्य न्याय देईल, असा विश्वास आहे. मात्र सीमाप्रश्नाच्या सुनावणीवरून गेल्या काही वर्षात जी चालढकल सुरू आहे ती थांबणे आवश्यक आहे. मराठी भाषिक जनता कानडी प्रशासनाच्या वरवंट्यात …

Read More »

काळ्यादिनी निपाणी कडकडीत बंद

  शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त : उघड्यावर सभा घेण्यास मज्जाव निपाणी (वार्ता) : सीमाभागातील मराठी बांधवावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सीमावासीयांना पाठींबा व मराठी बांधवावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून बुधवारी (ता.१) सीमाभागातील मराठी बांधवांनी बंद पाळला. या बंदला निपाणी शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठी बांधवांनी आपले दैनदिन व्यवसाय बंद ठेवून …

Read More »

महाराष्ट्रातील नेते मंडळींना कर्नाटक प्रदेश बंदी; सीमेवर पोलीस बंदोबस्त

  कोगनोळी : 1 नोव्हेंबर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक काळा दिन म्हणून पाळतात. यावेळी महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी बेळगावला मोठ्या प्रमाणात जात असतात. या सर्व लोकांना कर्नाटक शासनाने कर्नाटक प्रवेश बंदी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांच्या वतीने बॅरिकेट लावून बंदोबस्त ठेवण्यात …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास निपाणीत साखळी उपोषण

  मनोज जरांगे पाटील यांना निपाणीतून पाठिंबा; धर्मवीर संभाजीराजे सर्कलमध्ये मानवी साखळी निपाणी (वार्ता) : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रात जनआंदोलन सुरू आहे. तसेच मनोज जरांगे-पाटील हे नांदेड जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणासह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निपाणीत येथील सकल मराठा …

Read More »

लोकमान्य टिळक उद्यान बनले मद्यपींचा अड्डा

  नगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; दिव्या अभावी उद्यानात अंधार निपाणी (वार्ता) : दैनंदिन जीवनातील गर्दीपासून दूर जाण्यासाठी, बहुतेक लोक शांततेत थोडा वेळ घालवण्यासाठी उद्यानामध्ये जातात. काहीजण फक्त सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बागेत जातात. जर ते मोठ्यांसाठी विश्रांतीचे ठिकाण असेल तर लहान मुलांसाठी ते आवडते ठिकाण आहे. निपाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले लोकमान्य टिळक …

Read More »