Friday , June 5 2026
Breaking News

पतीचा गळा आवळून खून; खानापूरातील घटना

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील चिक्कमन्नोळी येथे पत्नीने पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील चिक्कमन्नोळी येथील रहिवासी बाबू कलाप्पा कर्की (48) याला दारूचे व्यसन जडले होते. त्याने शेती गहाण ठेवून कर्ज काढले होते. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने त्याला सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी रात्री जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या. तो गाढ झोपलेला पाहून पत्नीने दोरीने त्याचा गळा आवळून खून केला व मंगळवारी सकाळी आपला पती उठत नसल्याचे तीने शेजारील लोकांना सांगून घरी बोलावले. शेजारील लोकांनी त्याला उठवण्यासाठी प्रयत्न केला असता, तो मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर गावातील लोकांना ही माहिती समजली. मात्र बाबू कर्की याच्या गळ्याला वळ पडलेला दिसून आल्याने संशय व्यक्त झाला. याबाबत मंगळवारी दिवसभर तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर सदर घटना नंदगड पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी केली असता बाबू कर्की याच्या गळ्यावर दोरीचे वळ उमटले असल्याने संशय अधिक बळावला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यानंतर पत्नीने आपणच खून केल्याचे कबूल केले. मंगळवारी सायंकाळी शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत बाबू कर्की याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहेत. त्याच्या मुलगीच्या फिर्यादीवरून महादेवी बाबू कर्की हिला अटक करून बुधवारी रात्री उशिरा खानापूर न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर हजर केल्यानंतर तिची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *