Friday , April 17 2026
Breaking News

हालसिद्धनाथ यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता

Spread the love

 

कडक पोलिस बंदोबस्त : पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कोगनोळी : कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हालसिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरण संपन्न झाली. मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शनिवार (ता. 28) रोजी सकाळी कुरली येथील हालसिद्धनाथ मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत आरती व विविध धार्मिक कार्यक्रमा झाले. पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथे आणण्यात आली. या ठिकाणी कुरली आप्पाचीवाडी पालखी, अश्व, छत्री प्रमुख मार्गावरून खडक मंदिराजवळ आल्यावर मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी ढोल जागर(वालंग) झाला. हेडम खेळवण्यात आले. मुख्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी सात वाजता आरती झाली. रोज रात्री (वालंग) ढोल जागर पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली.
सिध्दार्थ ढोणे यांची पहिली व मंगळवारी पहाटे यात्रेची मुख्य भाकणूक संपन्न झाली.
यात्राकाळात निपाणी मंडल पोलिस निरीक्षक बी एस तळवार व ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात केला होता.
सलग पाच दिवस कोल्हापूर येथील प्रतिष्ठित कल्लाप्पांना पत्रावळे हालसिध्दनाथ अन्न छत्र यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. पाच दिवसांमध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी यासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
बुधवार तारीख 1 रोजी सायंकाळी आप्पाचीवाडी कुरली पालखी खडक मंदिर प्रदिक्षणा करून वाडा मंदिराकडे व तिथून घुमट मंदीरमार्गे कुरली पालखी कुरलीकडे रवाना झाली. कुरली येथील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक हालसिद्धनाथ मंदिरात रात्री उशिरा आली. यानंतर पाच दिवस सुरू असलेल्या हालसिध्दनाथ यात्रेचे सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उन्हाचा कहर, पारा ४० अंशावर

Spread the love  निपाणीकर घामाघुम; चार दिवसापासून उष्णतेची लाट कायम निपाणी (वार्ता) : निपाणी शहर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *