Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

निपाणी उरूसातील मानाच्या फकीरांची रवानगी

  कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती : फकीरांना बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा महान ‌अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची रवानगी रविवारी (ता.२९) परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करून करण्यात आली. यावेळी …

Read More »

कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न हास्यास्पद

  भाजपवर जोरदार हल्ला; आमदाराना अमिषाच्या आरोपाने खळबळ बंगळूर : कर्नाटक भाजपने राज्यातील आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. त्यांचा हा प्रयत्न हस्यास्पद असून तो यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. मंड्या काँग्रेसचे आमदार रविकुमार गौडा (गनिगा) यांनी वादाला तोंड फोडल्यानंतर हा आरोप झाला आहे. भाजप नेत्यांची एक …

Read More »

निपाणीतील कुस्तीमध्ये इचलकरंजीचा प्रशांत जगताप विजेता

  ऊरूसानिमित्त आयोजन : चटकदार ५० कुस्त्या निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या ऊरसानिमित्त शनिवारी (ता.२८) सायंकाळी येथील संत बाबा महाराज कुस्ती मैदानात आयोजित जंगी कुस्ती मैदानामध्ये इचलकरंजी येथील प्रशांत जगताप आणि मुरगुड येथील मंडलिक आखाडा येथील पैलवान रोहन रंडे यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लागली. त्यामध्ये इचलकरंजीच्या …

Read More »

निपाणी ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी चव्हाण वाड्यात खारीक, उदीचा प्रसाद

  निपाणी (वार्ता) : सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक हजरत दस्तगीर साहेब यांच्या ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२८) पहाटे दर्गाहचे संस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचे निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवलिहालकर सरकार, दादाराजे देसाई-निपाणकर सरकार यांच्या हस्ते लवाजमा मानाचे फकीर …

Read More »

लेखी आश्वासनानंतर रयत संघटनेचे आंदोलन मागे

  चार दिवसांनंतर ७ तास थ्री फेज वीज पुरवठा : रात्री १० तास सिंगल फेज वीज निपाणी (वार्ता) : यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पाणी असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले. त्यामुळे दिवसा १० तास थ्री फेज पुरवठा …

Read More »

निपाणीत उद्यापासून राजमणी चॅम्पियन ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा

  प्रतीक शहा : ३० हजारांची बक्षीसे निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे राजमणी चॅम्पियन्स ट्रॉफी आठव्या हंगामातील फुटबॉल स्पर्धेचे रविवारपासून (ता.२९) आयोजन करण्यात आले आहे. येथील श्री. समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी ३० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून फुटबॉल प्रेमींनी …

Read More »

कर्नाटकाची केंद्राकडे १७,९०१ कोटीची दुष्काळ निधीची मागणी

  मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट बंगळूर : यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कर्नाटक सरकारने बुधवारी केंद्राकडे १७,९०१.७३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. कर्नाटकचे कृषी मंत्री एन. चालुवराय स्वामी, ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी केंद्रीय कृषी सचिव मनोज …

Read More »

वाघाच्या लॉकेट प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ

  अभिनेते, पुजारी, राजकारण्यांच्या घरांची झडती बंगळूर : राज्याच्या राजकारणात वाघाच्या पंजाचे लॉकेट घातल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक चित्रपट अभिनेते, पुजारी, ज्योतिषी आणि राजकारणी अडकले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू ठेवला आहे. वाघाचे लटकन असलेले राजकारणी आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरांची झडती घेण्यात येत आहे. आज राज्याच्या …

Read More »

1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; म. ए. समितीतर्फे जांबोटीत जनजागृती फेरी

  पत्रकांचेही वाटप जांबोटी : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी आधी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्र पासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डाबण्यात आल्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय झाला आहे गेल्या 67 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात …

Read More »

उरूसाच्या मुख्य दिवशी भाविकांची गर्दी

  चव्हाण वाड्यातून गंध, गलेफ अर्पण; शनिवारी खारीक उदीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसाचा शुक्रवारी (ता.२७) मुख्य दिवस होता. त्यानिमित्त पहाटे, दंडवत, दुपारी नैवेद्य आणि कंदुरी चा कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त दर्शन आणि नैवेद्यासाठी भाविकांनी मोठी …

Read More »