Tuesday , April 21 2026
Breaking News

1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; म. ए. समितीतर्फे जांबोटीत जनजागृती फेरी

Spread the love

 

पत्रकांचेही वाटप

जांबोटी : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी आधी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्र पासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डाबण्यात आल्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय झाला आहे गेल्या 67 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे परंतु कर्नाटक सरकार गेल्या 67 वर्षापासून आपल्या घटनात्मक न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मराठी जनतेवर अनेक अत्याचार करून मराठी भाषिकांची मागणी पायदळी तुडवीत आहे कर्नाटक सरकारने सीमा भागातील मराठी भाषा व संस्कृती संपवण्याचा चंग बांधला आहे मात्र येथील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा अध्यापही कायम असून सीमा भागातील मराठी जनता दरवर्षी बेळगाव सह सीमा भागात एक नोव्हेंबर या दिवशी काळा दिन पाळून सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करते यावर्षी देखील 1 नोव्हेंबर या काळ्या दिनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हारताळ पाळावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शुक्रवारी जांबोटी येथे पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली व काळादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले
या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, म. ए. समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, म. ए. समिती जांबोटी विभाग उपाध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस जयराम देसाई, म. ए. समितीचे नेते माजी सभापती मारुती परमेकर, यांच्यासह खजिनदार संजीव पाटील, रवींद्र शिंदे, राजाराम देसाई, शंकर सडेकर, विठ्ठल देसाई, राजू चिखलकर, प्रभाकर बिरजे, प्रताप देसाई, मारुती देसाई, बाळासाहेब देसाई, भैरू मुतगेकर, सातेरी देसाई, मानू कोळपटे, शिवाजी दळवी, सुबराव देसाई, शिवाजी सडेकर, जयवंत घाडी, विठ्ठल राजगोळकर यांच्यासह बहुसंख्य मराठी भाषिक सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *