Wednesday , April 22 2026
Breaking News

उरूसाच्या मुख्य दिवशी भाविकांची गर्दी

Spread the love

 

चव्हाण वाड्यातून गंध, गलेफ अर्पण; शनिवारी खारीक उदीचा कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसाचा शुक्रवारी (ता.२७) मुख्य दिवस होता. त्यानिमित्त पहाटे, दंडवत, दुपारी नैवेद्य आणि कंदुरी चा कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त दर्शन आणि नैवेद्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उरूस कमिटीतर्फे दर्शनासाठी रांगेची सोय केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांच्या भर उरूसा निमित शुक्रवारी (ता.२७) पहाटे ३ वाजता चव्हाणवाडा समाधी स्थळाहून वाजत गाजत सर्व मानकरणच्या समवेत दर्गाहमध्ये जाऊन गलेफ, गंध चढविण्यात आला. यावेळी
रणजित देसाई- सरकार, संग्राम देसाई- सरकार, रमेश देसाई सरकार, नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार पृथ्वीराज चव्हाण, दादाराजे निपाणकर, संताजीराजे घोरपडे नवलिहाकर सरकार, प्रभाकर पाटील, जयराम मिरजकर, शकील मुजावर, अमजद मुजावर, शरद मळगे यांच्यासह मानकरी उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता अंमलझरी रोडवरील आंबेडकर नगर येथे विविध शर्यती पार पडल्या. रात्री ९.३० वाजता मिरज येथील रेश्मा ताज कव्वाल पार्टी आणि इचलकरंजी येथील सरदार ताज कव्वाल पार्टी यांच्यात कव्वालीचा जुगलबंदीचा कार्यक्रम झाला. उरुसानिमित्त दर्गाह परिसरात खेळणी पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल, जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. ऊरुस काळात पोलिसातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
—-
कंदुरीसाठी झुंबड
महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांच्या उर्सा निमित्त निपाणी सह कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांनी उपस्थिती लावली होती. शुक्रवारी पहाटेपासूनच दर्गाह परिसरात कंदुरी करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.

तीन दिवस मद्य दुकाने बंद
गुरुवारपासून (ता.२६) हजरत पिराने पीर दस्तगीर साहेबांचा उरूस सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरातील मद्य दुकाने गुरुवार ते शनिवार अखेर तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकातून समाधान व्यक्त होत आहे.

आज मानाचा फकीरांची रवानगी
शनिवारी (ता.२८) शिळा उरूस आहे. चव्हाण वाडा येथे खारीक व उदींचा कार्यक्रम,मानाचे फकीर रवानगी व भंडारखाना कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी तीन वाजता म्युनिसिपल हायस्कूल जवळील श्री संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदानात विविध गटातील कुस्त्या होणार आहेत.
रविवारी (ता.३१) पाकळणीचा कार्यक्रम होऊन उरुसाची सांगता होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *