लक्ष्मणराव चिंगळे; चिकोडी जिल्हा युवक काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : पक्ष संघटना मजबूत असल्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार आहेत. त्यासाठी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्ता येण्यासाठी युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. हे लक्षात घेऊन पुन्हा या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य …
Read More »राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ‘सद्गुरु’च्या तनुजा पाटीलची निवड
निपाणी (वार्ता) : येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम आयटी कॉलेज येथे पीयुसी जिल्हास्तरीय तायक्वांदो, ज्युदो व कराटे स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत तायक्वांदो या क्रीडा प्रकारात ५९ किलो वजन गटात मुलींच्या गटामध्ये सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या तनुजा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. …
Read More »कुर्ली हायस्कूलमध्ये आठ रेंजमधील जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा
निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ८ रेंज मधून ३२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांनाअखिल भारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव व देवचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच भालचंद्र अजरेकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. …
Read More »भाजपच्या उमेदवारीचे आश्वासन देऊन पाच कोटीची फसवणुक हिंदुत्ववादी कार्यकर्ती चैत्र कुंदापुरला अटक
बंगळूर : सेंट्रल क्राईम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या चैत्र कुंदापुर हीला बाइंदूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ती, इतर सात जणांसह, बंगळुरमधील हॉस्पिटॅलिटी आणि केटरिंग व्यवसायांसह शेफ्टॉक न्यूट्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेड चालवणारे उडुपी जिल्ह्यातील बाइंदूरचे …
Read More »कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडता येणार नाही
सर्वपक्षीय बैठकीनंतर सिद्धरामय्यांची माहिती बंगळूर : गेल्या १२३ वर्षांत राज्यासह कावेरी खोऱ्यात पावसाची तीव्र कमतरता आहे. अशा स्थितीत तामिळनाडूला पाणी सोडता येणार नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. कावेरी नदी जलव्यवस्थापन समितीने तामिळनाडूला आणखी १५ दिवस पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या शिफारशीच्या …
Read More »शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर सभासदांना १०० किलो साखर द्या : राजू पोवार
रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना सरकारने बंद केल्याच्या निषेधार्थ येथील लोकप्रतिनिधींनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. पण आज तागायत १५ वर्षे रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यासह आंदोलने केली आहेत. आता अचानकपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून …
Read More »शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराला बळी पडू नका
लोकायुक्त डीएसपी जे. रघु. ; निपाणीत लोकायुक्त, पोलिसांची बैठक निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात भ्रष्टाचारासह अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पण अजूनही लोकायुक्त खात्याबाबत म्हणावी तशी माहिती जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांना लाच म्हणून रक्कम द्यावी लागत आहे. त्याच्या विरोधात लोकायुक्त अधिकारी कार्यरत …
Read More »निरोगी जीवनासाठी खेळ आवश्यक : गटशिक्षणाधिकारी नाईक
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा निपाणी (वार्ता) : खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांविषयी आदर भावना तयार होते. बंधुभाव तयार होऊन नेतृत्वगुण वाढीस लागतात. खेळ हे मानवाला तनावातून मुक्त करण्याचे काम करत असतात, असे मत निपाणी गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. त्या कुर्ली येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात …
Read More »निपाणीत शुक्रवारी गुडघेदुखी, कंबरदुखीवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हास्पीटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, नी रीप्लेसमेंट आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील रोटरी हॉल येथे होणार आहे अनुभवी वैद्य डॉ. सारंग शेटे यांच्या मागदर्शनाखाली शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजल्या …
Read More »शॉर्टसर्किटने लाकडाच्या गोडाऊनला आग लागून निपाणीत लाखाचे नुकसान
निपाणी (वार्ता) : येथील मुरगुड रोडवरील सुरज हॉटेल जवळ असलेल्या प्रगती ट्रेडर्सच्या लाकडाच्या गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग लागून लाकडी सामानासह संगणक असे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास ही घटना घडली. तात्काळ अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत घटनास्थळासह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta