नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी; तालुका प्रशासनाच्या सूचना निपाणी (वार्ता) : शुक्रवारपासून (ता.२१) पुढील चार दिवस निपाणी तालुक्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोणत्याही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना, शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी, असा इशारा तहसीलदार विजयकुमार कटकोळ यांनी दिला …
Read More »निपाणी तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली
निपाणी परिसरात संततधार : प्रशासनाकडून विविध उपाय योजना निपाणी (वार्ता) : सलग तीन दिवस सुरू असलेल्या संतत धारेमुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा आणि दूधगंगा नदीवरील चार बंधारे गुरुवारी (२०) पाण्याखाली गेली आहेत. तर शुक्रवारी उर्वरित बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सावधगिरी बाळगत विविध उपायोजना केल्या आहेत. …
Read More »येत्या ५ दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
बेंगळुरू : नैऋत्य मोसमी पावसाचा जोर आजपासून राज्याच्या किनारी भागासह अंतर्गत भागात वाढण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या किनारपट्टी आणि उत्तरेकडील अंतर्गत भागासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर दक्षिणेकडील अंतर्गत भागासाठी पिवळा अलर्ट …
Read More »खानापूर तालुक्यात ५० नवीन मतदान केंद्रे वाढविण्यासंदर्भात तहसील कार्यालयात बैठक संपन्न
खानापूर : खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे. तसेच विस्तारानेही मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात घनदाट जंगल त्यातच आठ ते दहा किलोमीटर अंतरावर खेडी. त्यामुळे जंगलातून चालत जाऊन दुसऱ्या गावच्या मतदान केंद्रावर मतदान करताना मतदारांचे हाल होतात. अनेक वयोवृध्द मतदानापासून वंचित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार प्रकाश …
Read More »कोगनोळीकरांचा बंदला शंभर टक्के प्रतिसाद
सर्व व्यवहार बंद : रस्त्यावर शुकशुकाट कोगनोळी : अखिल भारतीय जैन समाजाने गुरुवार तारीख 20 रोजी भारत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोगनोळी मधील सर्व समाजाने गुरुवारी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून भारत बंद यशस्वी करावा असे जाहीर आवाहन समस्त जैन समाज यांच्यावतीने केले होते. कोगनोळीकरांनी जैन समाजाने पुकारलेल्या …
Read More »आजपासून खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होऊन बरेच दिवस उलटून गेले. मात्र निवडणूक कधी होणार याकडे ग्राम पंचायतीच्या सदस्यांचे लक्ष लागून आहे. अखेर आज गुरूवार दि. २० पासुन खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीला मुहूर्त मिळाला. खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम …
Read More »चांद शिरदवाड ग्रामपंचायत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या जयश्री पाटील
उपाध्यक्षपदी शितल लडगे यांची बिनविरोध निवड निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड ग्राम पंचायतच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री किरण पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भाजपाचे शितल रामगोंडा लडगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवडणूक करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून महातेंश हरोले यांनी काम पाहिले. निवडी नंतर पदाधिकाऱ्यांच्या समर्थकानी फटाके …
Read More »पाच हजाराची लाच घेताना दोघेजण लोकायुक्तांच्या जाळ्यात
निपाणी भूमी विभागातील घटना; अभिषेक बोंगाळे, पारेश सत्ती यांना अटक निपाणी (वार्ता) : नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना येथील उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे आणि भूमी विभागातील संगणक चालक पारेस हत्ती हे दोघेजण रंगेहात लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले. बुधवारी (ता.१९) दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे तहसीलदार कार्यालयिमध्ये खळबळ उडाली …
Read More »जैन मुनी हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवणार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेंगळुरू : नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनींच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. विधानसभेत याविषयी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपविला जाईल. जैन मुनी हत्या प्रकरणाचा अधिक तपास …
Read More »हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली
खानापूर : हब्बनहट्टी (जांबोटी ता. खानापूर) येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ओढे-नाले आणि नद्यांचे प्रमाणाबाहेर पाणी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta