निपाणीत स्वच्छतेबाबत विरोधाभास : पावसाळ्यात पसरणार दुर्गंधी निपाणी (वार्ता) : पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे पाऊस कधी पडेल, याचा नेम नाही. त्यापूर्वीच मॉन्सूनपूर्व तयारीच्या कामात येथील नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंततली आहे. अधिकाऱ्याकडून मान्सूनपूर्व तयारीची कामे हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. तरीही शहरात काही ठिकाणी चित्र उलटेच दिसत आहे. शहरातील …
Read More »आजाराला कंटाळून खानापूरात युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजी नगरात सततच्या आजाराला कंटाळून राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सदर दुर्दैवी युवतीची नाव रोहिणी रामचंद्र चोपडे (वय २३) असून रविवारी दि. २५ रोजी दुपारी घरी नसल्याचे पाहून त्या युवतीने घरात आत्महत्या केली. आई शेतीला गेली होती. …
Read More »मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणारे मुख्याध्यापक बाळासाहेब शंकर जाधव यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन जाधव दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी …
Read More »हिंदू, मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा राखा
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील; निपाणीत शांतता समितीची बैठक निपाणी (वार्ता) : हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण गुरुवारी (ता. २९) साजरा होत आहे. आतापर्यंत निपाणी शहर आणि परिसरात हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव सामाजिक सलोखा राखून दोन्ही सण शांततेने साजरा करीत आहेत. पण …
Read More »अमृत योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलांचे दिवास्वप्न
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवड; दीड वर्षापासून घरांच्या मंजुरीची प्रतिक्षा निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यानुसार दीड वर्षांपूर्वी कर्नाटकात तत्कालिन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यानी अमृत ग्रामीण वसती योजना जाहीर केली. याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील काही ग्रामपंचायतीची निवड करून या पंचायतीच्या कार्यक्षेत्रात हक्काच्या …
Read More »निश्चित ध्येय सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा
प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी; विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ निपाणी (वार्ता) : आपले ध्येय निश्चित करण्याचे आणि सत्यात उतरवण्याचे अगदी योग्य वय तुमचे असून त्यासाठी प्रयत्नशील रहा,असे मत प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी केले. के.एल.ई संस्थेचे जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयात पी. यू.सी प्रथम वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान …
Read More »खानापूर नगरपंचायतींच्या वार्ड नं. २च्या मिशन कंपाऊंड वस्तीत विकास कामासंदर्भात बैठक
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या वार्ड नंबर २ मधील मिशन कंपाऊंड वस्तीत रस्ता, पथदिवे, पाणी, गटारी आदी विकास कामासंदर्भात नगरसेवक तोहिद चाखंदणावर याच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन शनिवारी दि. २४ रोजी करण्यात आले. खानापूर शहरातील नगरपंचायतीला लागुन असलेल्या वार्ड नंबर २ च्या मिशन कंपाऊंड वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्याची …
Read More »तलावातील गाळ त्वरीत न काढल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचा इशारा; जवाहर तलाव गेटसमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाणी साठते. त्यानंतर तब्बल महिनाभर पाणी सांडव्यावरून वाहून वाया जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे अद्याप पाऊस …
Read More »गतीविरोधकासाठी नागरिकांचा रास्ता रोको
निपाणी इचलकरंजी मार्गावरील घटना : अधिकाऱ्यांच्या आश्वासननंतर रास्ता रोको मागे निपाणी (वार्ता) : लखनापूर अकोळ गळतगा या रस्त्यावर स्पीड ब्रेकर अभावी अनेक लहान मोठे अपघात घडत असून दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आठ मूक जनावरांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. या रस्त्याला लागूनच घरे, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे अपघात …
Read More »खानापूर म. ए. समिती नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात 3 जुलै रोजी महत्वाची बैठक
खानापूर : तालुका म. ए. समितीची नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून मते मांडावीत, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta