Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर म. ए. समिती नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात 3 जुलै रोजी महत्वाची बैठक

Spread the love

 

खानापूर : तालुका म. ए. समितीची नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून मते मांडावीत, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे निमंत्रक माजी ता. पं. सभापती मारूती परमेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मराठी भाषिकांत यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून पुन्हा समितीची मोट बांधण्यासाठी सक्षम कार्यकारिणीची गरज आहे. त्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहवे. जे कोणी नाराज आहेत, त्यांनीदेखील बैठकीला उपस्थित राहून त्यांची मते मांडावीत, असे आवाहन मारूती परमेकर यांनी केले.

मराठी भाषिकांवरील अन्याय, कानडीकरण यासारख्या मराठीविरोधी कृती वाढल्या आहेत. त्यासाठी समितीची कार्यकारीणी सक्षम असणे ही सध्याची गरज आहे. समिती केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून सीमाप्रश्न आणि मराठीसाठीच्या लढ्यातील संघटना आहे. त्यामुळे कार्यकारीणी सर्वसमावेशक असेल. दि. 3 रोजी होणाऱ्या बैठकीत निवड समिती गठीत केली जाईल व त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *