Wednesday , April 22 2026
Breaking News

खानापूर नगरपंचायतींच्या वार्ड नं. २च्या मिशन कंपाऊंड वस्तीत विकास कामासंदर्भात बैठक

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या वार्ड नंबर २ मधील मिशन कंपाऊंड वस्तीत रस्ता, पथदिवे, पाणी, गटारी आदी विकास कामासंदर्भात नगरसेवक तोहिद चाखंदणावर याच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन शनिवारी दि. २४ रोजी करण्यात आले.
खानापूर शहरातील नगरपंचायतीला लागुन असलेल्या वार्ड नंबर २ च्या मिशन कंपाऊंड वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्याची डागडुजी, वार्डातील पथदिवे, आदी समस्या नगरसेवक तोहिद चाखंदणावर यांनी जाणून घेऊन सोडवाव्या, अशी मागणी बैठकीत केली.
यावेळी नगरसेवक तोहिद चाखंदणावर यांनी सरकारकडून आलेल्या निधीसाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सहकार्याने प्रयत्न करून या वार्ड नंबर २ मशीन कंपाऊंड वस्तीत विकास साधु असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी राजेंद्र रायका यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
जयप्रकाश बालकट्टी, अमित अयंगार, अजित साईल, श्री. कुंभार आदी मिशन कंपाऊंड वस्ती बदल विचार मांडले व समस्या कायमस्वरूपी दुर करण्याबद्दल चर्चा केली.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *