Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांनी घेतली शपथ

बंगळूर : देशातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीत शनिवारी दुपारी १२.३० वाजता बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सिद्धरामय्या आणि डी. …

Read More »

हब्बनहट्टी येथे शेतकरी महिलेवर अस्वलांचा हल्ला, महिला गंभीर जखमी

हब्बनहट्टी : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी गावातील एका महिलेवर दोन अस्वलानी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली आहे.हब्बनहट्टी येथील रेणुका इराप्पा नाईक (वय 60 वर्षे) ही महिला आज सकाळी आठ वाजता आपली गुरे घेऊन शेताकडे गेली होती. नाल्याच्या ठिकाणी गेलेली जनावरे परत आणण्यासाठी गेली असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन …

Read More »

आजपासून कर्नाटकात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

  बेंगळुरू : आजपासून राज्याच्या किनारपट्टीवर सलग पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज दक्षिणेकडील भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि राजधानी बेंगळुरूमध्ये आज ढगाळ वातावरण आहे आणि दुपारी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. बेल्लारी, बेंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चित्रदुर्ग, तुमकूर, दावणगेरे, मंड्या, …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 10 जण घेणार मंत्रिपदाची शपथ!

  बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्यापैकी फक्त 8 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. डॉ. …

Read More »

लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’चा कान्स महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर

  निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील चित्रपट निर्माते मंगेश गोटुरे आणि निपाणीतील लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘गाभ’ या मराठी चित्रपटाचा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जागतिक प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रिमिअर गुरुवारी झाला. कान्स महोत्सवामध्ये ‘गाभ’चा जागतिक प्रिमिअर होणे, हा आमच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा व समाधानाचा क्षण आहे, अशी भावना निर्माते गोटुरे …

Read More »

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून भारतीय महिला कुस्ती पटूवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या महिलांना न्याय मिळावा यासाठी दिल्लीतील जंतर मंतर वर धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी येथील नागरिक आणि आम आदमी पक्षातर्फे तहसीलदारांना शुक्रवारी …

Read More »

निपाणीतील दोन युवक बेपत्ता

  निपाणी (वार्ता) : येथील अक्कोळ रोड वरील सावंत कॉलनी मधील दोघे युवक १४ हे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार योहान गुलाब इमॅन्युएल यांनी निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. जोसेफ योहान इमॅन्युएल (वय १७) आणि अखिलेश कमलेश अंतवाल (वय २२) अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. इमॅन्युएल आणि अखिलेश …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

  शरद पवारांसह देशभरातील महत्त्वाच्या विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण! बेंगळुरु : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत यावर आत्ता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणं काँग्रेससाठी सोपं नव्हतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. माझ्यासोबत १३६ आमदार आहेत …

Read More »

कालमनी नजीक बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

  खानापूर : खानापूर- आमटे मार्गावर धावणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने आमटे नजीक बसला अपघात झाल्याची घटना आज दि. 18 रोजी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. चालकाने प्रसंगावधान साधून रस्त्याकडेला असलेल्या एका काजूच्या बागेत बस घालून बस पलटी होता होता सावरल्याने मोठा अनर्थ तळाला आहे. याबाबत मिळालेली माहिती की, खानापूर बस …

Read More »

आमदार विठ्ठलराव हलगेकर व नेत्यांची धारवाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट

  विविध विषयावर चर्चा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रजमिनी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांमध्ये गेली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची काम ही अपूरी आहेत. तसेच काही सर्व्हिस रोड झाले नाहीत. त्याठिकाणी मुलाना, महिलाना, जनावरांना महामार्ग …

Read More »