Sunday , July 26 2026
Breaking News

आजपासून कर्नाटकात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Spread the love

 

बेंगळुरू : आजपासून राज्याच्या किनारपट्टीवर सलग पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आज दक्षिणेकडील भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि राजधानी बेंगळुरूमध्ये आज ढगाळ वातावरण आहे आणि दुपारी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

बेल्लारी, बेंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चित्रदुर्ग, तुमकूर, दावणगेरे, मंड्या, म्हैसूर, हसन, रामनगर, चिक्कबळ्ळापूर कोलार, चामराजनगर, शिमोगा, कोडगु जिल्ह्यांत दक्षिणेकडील भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल.

येत्या पाच दिवसांतील शेवटचे दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागेल, असे हवामान खात्याने सांगितले. यावेळी किनारपट्टी आणि उत्तरेकडील अंतर्देशीय जिल्ह्यांमध्ये पावसाचे वारे सक्रिय राहतील, अशीही माहिती देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रश्नपत्रिका फुटीला लगाम; ७० हजार पदांच्या भरतीसाठी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’

Spread the love  भरती परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक; जिल्हाधिकाऱ्यांना समन्वयाच्या सक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *