Saturday , June 6 2026
Breaking News

हब्बनहट्टी येथे शेतकरी महिलेवर अस्वलांचा हल्ला, महिला गंभीर जखमी

Spread the love

हब्बनहट्टी : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी गावातील एका महिलेवर दोन अस्वलानी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली आहे.हब्बनहट्टी येथील रेणुका इराप्पा नाईक (वय 60 वर्षे) ही महिला आज सकाळी आठ वाजता आपली गुरे घेऊन शेताकडे गेली होती. नाल्याच्या ठिकाणी गेलेली जनावरे परत आणण्यासाठी गेली असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन अस्वलांनी अचानक हल्ला चढविला. तिच्या कपाळाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा करताच तिचा पती व इतर शेतकरी मदतीला धावून आले व लाठ्या काठ्या व दगडाने मारून अस्वलांना पिटाळून लावत महिलेला त्यांच्या तावडीतून बाजूला केले. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या रेणुका हिला बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *