शेट्टर संतप्त, माघार घेणार नसल्याचे संकेत बंगळूर : भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना नवोदितांसाठी मार्ग काढण्याची सूचना केली असली तरी, शेट्टर यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवू आणि कोणत्याही स्थितीत सुमारे २५ हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजयी होऊ असे सांगून पक्ष श्रेष्ठींचा आदेश झिडकारण्याचे स्पष्ट …
Read More »बेळगाव उत्तरमधून डॉ. रवी पाटील यांना संधी; बेळगाव दक्षिणमधून पुन्हा अभय पाटील यांना संधी
बेळगाव ग्रामीणमधून जारकीहोळींच्या मर्जीतले हिंडलगा माजी ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बेळगाव उत्तर मधून रवी पाटील तर बेळगाव दक्षिण मधून पुन्हा एकदा आमदार अभय पाटील यांना संधी देण्यात आली असून प्रचारासाठी त्यांचा मार्ग खुला आहे. बेळगाव जिल्ह्यातील …
Read More »लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी नाही : बोम्माई यांचे संकेत
नवी दिल्ली : माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना यावेळी तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. लक्ष्मण सवदी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी लक्ष्मण सवदी यांच्या सतत संपर्कात आहे. ते अथणीचे तिकीट मागत आहे. पण आपले सरकार अस्तित्वात येण्यास …
Read More »माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा राजकारणातून निवृत्त
बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिकीट यादी जाहीर होण्याची उलटी गिनती सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी आपला मुलगा के. ई. कांतेश यांना तिकीट देण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र त्यालाही भाजप नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. निवडणुकीच्या राजकारणातून …
Read More »नियमांचे पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा
बसवराज एलिगार ; निपाणीत शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून ही जयंती डॉल्बीमुक्त समाजाला विचाराची प्रेरणा देणारी ठरावी, असे मत चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगर …
Read More »मतदार संघातील भ्रष्टाचार मुक्तीसाठी निवडणूक रिंगणात
डॉ. राजेश बनवन्ना; निपाणीत आम आदमी पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला नागरिक कंटाळले आहेत. शिवाय राष्ट्रीय पक्षाबाबत सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. समाजातील भ्रष्टाचार व महागाई कमी करण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्य सुरू आहे. निपाणी मतदार संघात परिवर्तन घडवण्यासाठी आपण आम आदमी पक्षातर्फे निवडणूक रिंगणात …
Read More »कोगनोळी टोलवर 2 लाख 50 हजार जप्त
पोलिसांची कारवाई : सलग तिसऱ्या दिवशी कार्यवाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये 2 लाख 50 हजार रुपये सापडल्याची घटना शनिवारी (दि. 10) रोजी 8 च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक …
Read More »निपाणीतून डॉ. राजेश बनवन्ना यांना आम आदमी पक्षाची उमेदवारी
चिकोडीतून श्रीकांत पाटील; अथणी मधून ॲड. संपतकुमार शेट्टी निपाणी (वार्ता) : निपाणी विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहे. निपाणी येथे डॉ. राजेश बनवन्ना, चिक्कोडीतून श्रीकांत पाटील तर अथणीमधून ॲड. संपतकुमार शेट्टी यांना सोमवारी (ता.१०) उमेदवारी मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून येथील डॉ. राजेश बनवन्ना व त्यांच्या …
Read More »काँग्रेसच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ
राजेश कदम; निपाणीत गॅरंटी कार्डाचे वितरण निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात यावेळी काँग्रेसचेच सरकार येणार आहे. देशात महागाईने लोक होरपळत आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारने सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी काही लोकोपयोगी योजना आणलेल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, युवनिधी यासारख्या योजना आणल्या आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असल्याचे मत निपाणी ब्लॉक …
Read More »भाजपची बैठक संपली, मात्र उमेदवार यादीचा सस्पेन्स अद्यापही कायम
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अवघ्या काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आहे. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अद्यापही काही मतदारसंघांतील उमेदवारी बाबत चर्चा होणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta