Monday , September 21 2026
Breaking News

कोगनोळी टोलवर 2 लाख 50 हजार जप्त

Spread the love

 

पोलिसांची कारवाई : सलग तिसऱ्या दिवशी कार्यवाही
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये 2 लाख 50 हजार रुपये सापडल्याची घटना शनिवारी (दि. 10) रोजी 8 च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर मुंबईहून बेंगलोरकडे जात असणाऱ्या खाजगी चारचाकी गाडीची तपासणी केली.
गाडीतील गोकुळदास पांडुरंग प्रभु यांच्याकडे 2 लाख 50 हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला.
निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, रमेश पोवार आदी कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *