कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे रविवार तारीख 4 रोजी रात्री 12 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी आडी मल्लया रोडवर दीपक कदम यांच्या घरालगत शेतातून मुख्य रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. हणबरवाडी येथील …
Read More »आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या अप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार झाल्याची घटना सोमवार तारीख सहा रोजी सायंकाळी 7 वाजता घडली. चालक-मालक सुरेंद्र चव्हाण (वय 28) राहणार पालघर ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वतः मालक व चालत असणारे सुरेंद्र चव्हाण आयशर गाडी …
Read More »विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अरिहंत शिष्यवृत्तीचा आधार
सहकारत्न रावसाहेब पाटील :१५२ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपये वाटप बोरगांव (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाकडून सहकार धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू आहे. सभासदांच्या सभासदांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सात वर्षापासून शिष्यवृत्ती योजना चालु असून ७५ टक्के पेक्षा जादा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा …
Read More »रासाई शेंडूर १३ पासून भैरवनाथ यात्रा
धार्मिक कार्यक्रमासह शर्यती, कुस्ती मैदान : लेझीम स्पर्धेचे आकर्षण निपाणी (वार्ता) : शेंडूर येथील श्री रासाई, भैरवनाथ यात्रा रविवारपासून (ता.१२) सुरू होणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध शर्यतींचे आयोजन केल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली. रविवारी (ता. १२) सकाळी ६ वाजता श्री भैरवनाथ देवास अभिषेक व जागर, सकाळी ९ …
Read More »शैक्षणिक क्रांतीसाठी निरंतर कार्यरत
मंत्री शशिकला जोल्ले : स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्यांच्यामुळेच आपण मंत्रीपदापर्यंत पोहोचून आतापर्यंत निपाणी मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. या कामासह शिक्षणालाही महत्त्व देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या निकालात काढल्या आहेत, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. …
Read More »निपाणी भागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न
आमदार चन्नराज हट्टीहोळी :अक्कोळमध्ये समुदाय भवनाचे भूमिपूजन निपाणी (वार्ता) : विधानसभा परिषद निवडणुकीत या भागातील नागरिकांनी आपल्याला संधी दिली आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार सध्या कामाला सुरुवात केली आहे. निपाणी भागातील विविध विकास कामासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही विधानपरिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली. अक्कोळ येथे त्यांनी आपल्या …
Read More »शेडेगाळी गावच्या नामफलकाचे अनावरण
खानापूर : ता. खानापूर मौजे शेडेगाळी येथील गावच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. पूर्वीचा नामफलक हा गेले चार महिने जमीनदोस्त होऊन पडलेला होता परंतु या नामफलकाकडे ग्रामपंचायतचे लक्ष देखील नव्हते. ग्रामपंचायतचे पी डी ओ यांना शेडेगाळी गावचे ग्रामपंचायत सदस्य यांनी वारंवार निवेदन देऊन देखील त्या नामफलकाची दखल घेतली नव्हती. शेवटी …
Read More »मोदेकोपच्या ३५ यल्लम्मा भक्तांना अन्नातून विषबाधा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील यल्लम्मा भक्त दरवर्षी सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनाला जातात. त्याप्रमाणेच मोदेकोप (ता. खानापूर) येथील रेणुका देवीचे भक्त सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेवरून मोदेकोप गावाला आले. यल्लम्मा यात्रेवरून आलेल्या जवळपास ३५ भक्तांना अन्नातून विषबाधा झाली. लागलीच त्यांना खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व …
Read More »खानापूरच्या मलप्रभा क्रिडांगणाचा नेत्यांकडून वापर पण विकासाकडे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या ठिकाणी जांबोटी क्राॅसजवळ माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात क्रिडांगणाचा प्रस्ताव होऊन क्रिडांगण उभारण्यात आले. त्यांच्या काळात मलप्रभा क्रिडांगणाचा विकास झाला. त्यानंतर मलप्रभा क्रिडांगणाच्या विकासाचा पत्ताच नाही. आजतागायत विकास नसलेल्या क्रिडांगणावर स्पर्धा भरविल्या जातात. अनेक नेत्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र विकासाकडे कुणाचेच लक्ष …
Read More »पत्रकारांच्या विविध मागण्या येत्या अर्थसंकल्पात मांडणार : मुख्यमंत्री बोम्माई
विजयपूर : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात येण्यारा अर्थसंकल्पात मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. विजयपूरातील कंदगल हनमंतराय रंगमंदिरात आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, ग्रामीण पत्रकारांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta