Sunday , July 26 2026
Breaking News

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अरिहंत शिष्यवृत्तीचा आधार

Spread the love
सहकारत्न रावसाहेब पाटील :१५२ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपये वाटप
बोरगांव (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाकडून सहकार धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू आहे. सभासदांच्या सभासदांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सात वर्षापासून शिष्यवृत्ती योजना चालु असून ७५ टक्के पेक्षा जादा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा दहावी आणि बारावी मधील १५२ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपयांची शिष्यवृत्ती वाटप केली आहे. निरंतरपणे हा उपक्रम चालू राहणार असल्याचे मत
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी दिली.
बोरगाव येथे दहावीमध्ये अधिक गुण मिळवलेल्या १०२ विद्यार्थ्यांना व बारावीत अधिक गुण मिळवलेल्या ५० विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करून ते बोलत होते.
उत्तम पाटील यांनी, अरिहंत उद्योग समूहाने विविध क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवून समाजातील प्रत्येक व्यक्तीला मदत केली आहे. संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली  संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थपणामुळे संस्थेने कर्नाटक, महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.मुख्य शाखेसह सर्व शाखेमध्ये ही योजना राबवली जात आहे. सभासदांच्या शिक्षणासाठी कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील हे निरंतर कार्यरत असल्याचे सांगितले.
यावेळी मीनाक्षी रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, संचालक श्रीकांत वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, अभयकुमार करोले, मुख्य शाखा व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहाय्यक व्यवस्थापक शांतिनाथ तेरदाळे, अभिनंदन बेनाडे, प्रकाश जंगटे, राजेंद्र एदमाळे, बाळासाहेब हावले, संजय पवार,/शांतिनाथ पाटील यांच्यासह विद्यार्थी अरिहंत परिवारातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवानंद इंगळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *