Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

हणबरवाडी पिण्याचे पाणी सुरळीत देण्याची ग्रामस्थांची मागणी

  कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे गेल्या चार-पाच दिवसापासून पिण्याचे पाणी आले नसल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना सुरळीत पाणी देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना विजय खोत म्हणाले, हणबरवाडी येथील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतच्या सदस्यांना व …

Read More »

विद्यार्थिनींनी घेतली एक आगळीवेगळी शपथ…

  सौंदलगा : सौंदलगा येथील सरकारी उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेमध्ये अभ्यासासाठी दोन तास या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत टीव्ही पाहणार नाही व हातामध्ये मोबाईल घेणार नाही, अशी शपथ विद्यार्थिनींच्याकडून घेण्यात आली. दररोज सायंकाळी टीव्ही पाहण्यामध्ये आणि मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना अभ्यासाकडे पुन्हा वळवण्यासाठी, मुलींच्या शाळेमध्ये अभ्यासासाठी दोन तास …

Read More »

लाल बावटा आडी शाखेकडून पेंटर किटचे वितरण

  सौंदलगा : गुरुवार दि.19/1/2023 रोजी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना शाखा आडी यांच्याकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेंटर किटचे वाटप सीआयटीयु तालुका कमिटी सदस्य राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास बहुसंख्येने बांधकाम कामगार महिला व पुरुष उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. दिलीप वारके ग्राम पंचायत कामगार …

Read More »

सीमावासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू : माजी आमदार दिगंबरराव पाटील

  माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने खानापूर : सीमावासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी दिली. दिगंबरराव पाटील यांच्या 68 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे …

Read More »

भरधाव वाहनाच्या धडकेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

  जोयडा तालुक्यातील रामनगर येथील घटना खानापूर : रस्त्याच्या बाजूने पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना पाठीमागून आलेल्या बोलेरोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील रामनगरजवळ घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, धारवाडहून रामनगर मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक 26 जानेवारीला

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे. बैठकीत खालील विषयावर विचारविनिमय करण्यात येणार आहे. 1) संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी फिरून संपर्क दौरा करून मराठी माणसाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणेबाबत. 2) मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

सहकार क्षेत्रात राजकारण असू नये : शिलवंत

  विजयपूर : अलीकडे काही सहकारी पतसंस्था राजकीय लाभासाठी, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्देशाने सुरू करण्यात येत आहेत किंवा चालविण्यात येत आहेत हे योग्य नसून सहकारी क्षेत्रात राजकारण असू नये असे मत सहकार भारती कर्नाटक राज्य अध्यक्ष राजशेखर शिलवंत यांनी व्यक्त केले. विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात …

Read More »

निपाणीत उद्यापासून ‘अरिहंत’ चषकास प्रारंभ

राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलिबॉल स्पर्धा : स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे निपाणी (वार्ता): अर्जुन नगर  येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार ता.२२ ते बुधवार ता.२४ अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीची पाहणी शुक्रवारी …

Read More »

कोगनोळी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

  कोगनोळी : येथील संयुक्त वार्ड नंबर तीन मधील ग्रामस्थ, युवक यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पुतळा पूजन करून अभिवादन करण्यात आले. राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने भगवा चौक परिसराची स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. यावेळी माजी सैनिक बाबुराव गायकवाड, सचिन इंगवले, उद्योगपती शहाजी चव्हाण, यांच्यासह संयुक्त वार्ड नंबर 3 …

Read More »

‘मराठा मंडळ’च्या फूड फेस्टिवलमध्ये अनेक पदार्थांचा घमघमाट

विद्यार्थ्यांनी बनवले अनेक पदार्थ : मान्यवरांनी घेतली चव निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी मधील हौशाबाई विठ्ठलराव कदम मराठी विद्यानिकेतन मराठा मंडळ  संचलित, बालवाडी विभाग, विठ्ठलराव कदम मराठी विद्यानिकेतन आणि मराठा मंडळ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झंकार – २०२३’ हा वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत ‘फूड फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी …

Read More »